मुंबई : प्रतिनिधी : विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने झिशान सिद्दीकी यांच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर उमदेवारी अर्ज भरला. प्रहार संघटनेचे माजी आमदार बच्चू कडू यांनी शिवसेनेते प्रवेश केला आहे. कडू यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. आज गुरूवारी दुपारी तीन वाजेपर्यंत निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बैठक घेतल्यानंतर झिशान सिद्दीकीच्या उमेदवारीची घोषणा केली. झिशान सिददीकींचे वडील बाबा सिद्दीकी ४० वर्षे काँग्रेसमध्ये होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर त्यांनी अजित पवारांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. ऑक्टोबर २०२४ मध्ये बिश्नोई टोळींनी त्यांची हत्या केली होती. त्यानंतर सिद्दीकी कुटुंबाची राजकीय वारसदारी झिशान यांच्याकडे आली आहे. झिशान हे काँग्रेसचे आमदार होते. पण विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंगचा त्यांच्यावर संशय होता. काँग्रेस पक्षातून त्यांचे निलंबन झाल्यावर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. विधान परिषदेची उमेदवारी देऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन केले आहे. (Zeeshan Siddiqui given a chance by NCP)
विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी १२ मे रोजी निवडणूक होत आहे. भाजपने यापूर्वी सहा उमेदवारांची घोषणा केली आहे. महाविकास आघाडीच्या वाट्याला एक जागा येत असून शिवसेनेकडून अंबादास दानवे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. पण महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाने उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला होता. शिवसेनेकडून दानवे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने उमेदवारी अर्ज भरण्याचे ठरवले आहे. काँग्रेसने उमेदवारी अर्ज भरू नये यासाठी शिवसेनेकडून मनधरणी सुरू आहे. शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला दोन जागा असूनही अजूनही उमेदवारांची घोषणा केलेली नाही. निलम गोऱ्हे आणि बच्चू कडू यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. (Zeeshan Siddiqui given a chance by NCP)