प्रयागराज : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाकुंभमध्ये सोमवारी त्रिवेणी संगमावर गंगास्नान केले. त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि इतर संत उपस्थित होते. (Amit Shah’s holy dip)
महाकुंभ हा जगातील सर्वाधिक मोठा धार्मिक मेळा आहे. या महाकुंभ मेळ्याची सुरुवात प्रयागराज येथे झाली आहे. त्यात सहभागी होण्यासाठी अमित शहा सोमवारी नवी दिल्लीहून पोहोचले. मुख्यमंत्री योगी आणि मंत्रिमंडळातील अन्य सदस्यांनी त्यांचे विमानतळावर स्वागत केले. त्यानंतर शहा यांनी साधूसंतांच्या मंत्रोच्चारात त्रिवेणी संगमावर स्नान केले. शहा यांच्यासह त्यांचे पुत्र जय आणि नातू हेही प्रयागराज येथे आले आहेत. स्नानानंतर शहा बडे हनुमानगढी आणि अभयवत मंदिराला भेट देणार आहेत, असे राज्याच्या प्रसिद्धी विभागाने म्हटले आहे. (Amit Shah’s holy dip)
तरंगत्या जेटीवर असलेल्या झोपडीवर जुनापिठाधीश्वर महामंडलेश्वर आचार्य अवधेशानंद गिरीजी महाराज आणि इतर काही संतांशी गृहमंत्र्यांनी संवाद साधला. गुरु शरणानंद जी यांच्या आश्रमालाही ते भेट देतील. गुरु शरणानंदजी आणि गोविंद गिरीजी महाराज यांची ते भेट घेतील. शिवाय शृंगेरी, पुरी आणि द्वारकाच्या शंकराचार्यांच्या भेटीनंतर अमित शहा संध्याकाळी प्रयागराजहून दिल्लीला रवाना होतील, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. (Amit Shah’s holy dip)
स्नानाचे दिवस
महाकुंभसाठी प्रचंड बंदोबस्त आहे. उत्तर प्रदेश पोलिस आणि निमलष्करी दलांसह दहा हजारावर अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. महाकुंभमध्ये २९ जानेवारी (मौनी अमावस्या – दुसरे अमृत स्नान), ३ फेब्रुवारी (बसंत पंचमी – तिसरे अमृत स्नान), १२ फेब्रुवारी (माघी पौर्णिमा), आणि २६ फेब्रुवारी (महा शिवरात्री)असे या मेळ्यातील स्नानाचे महत्त्वाचे दिवस आहेत.
#WATCH | #MahaKumbh2025 | Union Home Minister Amit Shah takes a holy dip at Triveni Sangam in Prayagraj, Uttar Pradesh. pic.twitter.com/TH2MFFgwA5
— ANI (@ANI) January 27, 2025
हेही वाचा :
राष्ट्रपती, पंतप्रधान कुंभमेळ्यासाठी येणार
महाकुंभ : पंडित नेहरू ते मोदी