Home » Blog » Anant Garje : पंकजा मुंडे यांचा पीए अनंत गर्जेला अटक

Anant Garje : पंकजा मुंडे यांचा पीए अनंत गर्जेला अटक

by प्रतिनिधी
0 comments
Anant Garje

मुंबई : पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांना रविवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास वरळी पोलिसांनी अटक केली. अनंत गर्जे यांची पत्नी डॉ. गौरी पालवे गर्जेने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. या गुन्ह्यात पोलिसांनी गर्जे यांना अटक केली आहे.

गर्जे यांच्या पत्नीने आत्महत्या केल्यानंतर गौरी पालवे यांच्या कुटुंबियांनी अनंत गर्जे यांच्यावर पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला. ही आत्महत्या नसून हत्या केली असल्याचा दावा केला आहे. फेब्रुवारी २०२५ मध्ये गर्जेने डॉ. गौरी यांचा विवाह झाला होता. गौरी या केईएम हॉस्पिटलमध्ये डेंटिस्ट विभागात काम करत होत्या. (Anant Garje)

अनंत गर्जे हे अनेकवर्षे पंकजा मुंडे यांचे पीए आहेत. त्यांचे लग्नापूर्वी एका महिलेशी अफेयर होते. त्याची माहिती समजल्यानंतर अनंत आणि गौरी यांच्यात खटके उडाले होते अशी माहिती पुढे आली आहे. या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पोलिस ठाण्यात जाऊन गौरी पालवे कुटुंबियांच्यावतीने अनंत गर्जे यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. आत्महत्येच्या घटनेनंतर अनंत गर्जे गायब होता. पोलिसांनी या घटनेची सखोल चौकशी करुन कारवाई करावी, अशी मागणी मंत्री पंकजा मुंडे यांनी केली होती. त्यानंतर रविवारी मध्यरात्री अनंत गर्जे पोलिसांना शरण आला. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. (Anant Garje)

दरम्यान शवविच्छेदनानंतर आज सोमवारी सकाळी गौरी यांचा मृतदेह अनंत गर्जे यांच्या अहिल्यानगर येथील पाथर्डीतील मोहोज देवढे गावी आणला. गौरीचे अंत्यसंस्कार अनंत गर्जे यांच्या दारात करावे अशी मागणी गौरी पालवे यांच्या कुटुंबातील सदस्यांनी केली. त्यामुळे दोन्ही कुटुंबियांनी बाचाबाची झाली. पोलिसांनी मध्यस्ती करत दोन्ही कुटुंबियांना शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही काळ तणाव झाला होता. त्यानंतर गौरी पालवे यांच्यावर गावाच्या बाहेर अंत्यसंस्कार करण्यात आले. (Anant Garje)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00