Home » Blog » फुटबॉल खेळताना युवकाचा मृत्यू

फुटबॉल खेळताना युवकाचा मृत्यू

कोल्हापूरात घडली घटना

by प्रतिनिधी
0 comments
Kolhapur

कोल्हापूर : प्रतिनिधी : टर्फवर फुटबॉल खेळत असताना युवकाचा दुर्दवी मृत्यू झाला. महेश धर्मराज कांबळे (वय ३० रा. निर्माण चौक, संभाजीनगरजवळ) असे युवकाचे नाव आहे.  आज (दि.१५) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. (Kolhapur)

महेश कांबळे हे अ‍ॅक्सिस बँकेत फिल्ड एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत होते. आज सुट्टी असल्याने दुपारी ते मित्र आणि गल्लीतील लहान मुलांसह कळंबा येथील टर्फवर खेळायला गेले. खेळत असताना त्यांना चक्कर आली आणि ते कोसळले. त्याच्या सहकाऱ्यांनी त्यांना उठवून बसवले. त्यानंतर ते पाणी प्याले. मला काही झालेले नाही. तुम्ही खेळा असे सांगून ते घरी आले. घरी त्यांना पुन्हा चक्कर आली आणि ते बेशुध्द पडले. त्यांना खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना सीपीआर हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल करण्यात आले. पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. सीपीआर पोलिस चौकीत फुटबॉल खेळत असताना मृत्यू अशी नोंद झाली आहे. महेश कांबळे यांना हृदयविकाराचा झटका आला असल्याची चर्चा त्यांच्या मित्रांमध्ये सुरू होती.

हेही वाचा :

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00