Home » Blog » संजीव खन्ना पुढचे सरन्यायाधीश

संजीव खन्ना पुढचे सरन्यायाधीश

Sanjiv Khanna : संजीव खन्ना पुढचे सरन्यायाधीश

by प्रतिनिधी
0 comments
Sanjiv Khanna

नवी दिल्ली : न्यायमूर्ती संजीव खन्ना हे सर्वोच्च न्यायालयाचे ५१वे सरन्यायाधीश असतील. सरन्यायाधीश धनंडय चंद्रचूड यांनी त्यांच्या नावाची सरकारकडे शिफारस केली आहे. चंद्रचूड दहा नोव्हेंबरला निवृत्त होणार आहेत. (Sanjiv Khanna)

परंपरा अशी आहे, की विद्यमान सरन्यायाधीश आपल्या उत्तराधिकाऱ्याच्या नावाची शिफारस तेव्हाच करतात, जेव्हा त्यांना कायदा मंत्रालयाने तशी विनंती केली जाते. सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यानंतर न्या. खन्ना यांचे नाव ज्येष्ठता यादीत आहे. त्यामुळे न्यायमूर्ती खन्ना यांचे नाव पुढे करण्यात आले आहे; मात्र त्यांचा कार्यकाळ केवळ सहा महिन्यांचा असेल. ६४ वर्षीय न्यायमूर्ती खन्ना १३ मे २०२५ रोजी निवृत्त होणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून खन्ना यांनी ६५ निवाडे लिहिले आहेत. या कालावधीत ते सुमारे २७५ खंडपीठांचा भाग राहिले आहेत.

दिल्ली उच्च न्यायालयात १४ वर्षे न्या. खन्ना यांचा जन्म १४ मे १९६० रोजी झाला. त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या ‘कॅम्पस लॉ सेंटर’मधून कायद्याचे शिक्षण घेतले. पदवीनंतर त्यांनी १९८३ मध्ये दिल्ली बार कौन्सिलमध्ये वकील म्हणून नोंदणी केली. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बनण्यापूर्वी ते १४ वर्षे दिल्ली उच्च न्यायालयात न्यायमूर्ती होते. २०१९ मध्ये त्यांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती झाली. न्या. खन्ना यांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बनवण्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. (Sanjiv Khanna)

हेही वाचा :

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00