Home » Blog » ‘काळा दिन’ फेरीत हजारो मराठी भाषिकांचा सहभाग

‘काळा दिन’ फेरीत हजारो मराठी भाषिकांचा सहभाग

by प्रतिनिधी
0 comments
Thousands of Marathi speakers participate in the ‘Black Day’ march

बेळगाव : प्रतिनिधी : ‘बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकी सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’ , ‘बेळगाव आमच्या हक्काचे नाहीं कोणाच्या बापाचे’, ‘कोण म्हणतंय देत नाहीं घेतल्याशिवाय राहत नाही’ अशा जोरदार घोषणा देत मराठी भाषिकांनी काळा दिन पाळून फेरी काढून पुन्हा एकदा महाराष्ट्रात जाण्याचा वज्रनिर्धार व्यक्त केला.दरम्यान काळा दिन रॅलीत सहभागी होण्यासाठी कोल्हापूरहून निघालेल्या शिवसेना नेते आणि शिवसैनिकांना पोलिसांनी कोगनोळी टोल नाक्यावरच अडवले. (Thousands of Marathi speakers participate in the ‘Black Day’ march)

भाषावार प्रांत रचनेच्या वेळी बेळगाव आणि अन्य भागात मराठी भाषिक बहुसंख्येने असूनही सीमाभाग अन्यायाने कर्नाटकात डांबण्यात आला. तेव्हापासून सत्तर वर्षे झाली सीमावांधव दरवर्षी एक नोव्हेंबर रोजी काळा दिन पाळून महाराष्ट्रात सामील होण्याची इच्छा व्यक्त करतात.पोलीस खाते आणि जिल्हा प्रशासनाने फेरी काढण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीला परवानगी नाकारली. तरीही मराठी भाषिकांनी दडपशाहीला दाद न देता काळा दिन पाळून फेरी काढून मराठी भाषिकांच्या बाण्याचे दर्शन घडवले. (Thousands of Marathi speakers participate in the ‘Black Day’ march)

धर्मवीर संभाजी उद्यान येथून सुरु झालेल्या फेरीत हजारो मराठी भाषिक सहभागी झाले होते. दंडाला काळ्या पट्ट्या बांधून हातात भगवा ध्वज आणि फलक घेऊन मराठी भाषिक फेरीत सहभागी झाले होते. शहरातील प्रमुख मार्गांवर फिरून मराठा मंदिर येथे फेरीची सांगता झाली. फेरी संपल्यावर झालेल्या जाहीर सभेत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. (Thousands of Marathi speakers participate in the ‘Black Day’ march)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!