Home » Blog » कुंभमेळ्याच्या खर्चात ३५ हजार कोटीचा भ्रष्टाचार; रोहित पवारांचा आरोप

कुंभमेळ्याच्या खर्चात ३५ हजार कोटीचा भ्रष्टाचार; रोहित पवारांचा आरोप

by प्रतिनिधी
0 comments
Corruption worth 35,000 crore rupees in Kumbh Mela expenditure

पुणे : प्रतिनिधी : नाशिकमध्ये होणार असलेल्या कुंभमेळ्यासाठी उभारण्यात आलेल्या पायाभूत सुविधांसाठी झालेल्या खर्चात ३५ हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार  रोहित पवार यांनी केला आहे. रोहित पवार यांनी आरोपाबाबत ‘एक्स’ सोशल मिडियावर सविस्तर पोस्ट केली आहे. (Corruption worth 35,000 crore rupees in Kumbh Mela expenditure)

रोहित पवार यांनी एक्स पोस्टवर असे म्हटले आहे की, अन्नदाता शेतकरी भीषण दुष्काळाच्या आगीत होरपळत असताना, हे सरकार त्याच्या हातावर ५ हजार रुपये टिकल्या टेकवून त्याची थट्टा करणार, आणि दुसऱ्या बाजूला नाशिक कुंभमेळ्याच्या नावाखाली केल्या जाणाऱ्या ३५ हजार कोटी रुपये खर्चाचा कोणताही हिशोब द्यायला तयार नाही. कुंभमेळ्याच्या निधीतून होणाऱ्या कामांमध्ये प्रचंड अनियमितता, निकृष्ट दर्जा आणि भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप होत आहेत. यातील काही माहिती आमच्याकडं असून सरकारकडूनही ही माहिती मिळतेय का? हे पाहण्यासाठी एक लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही विविध शासकीय विभागांकडे पत्रव्यवहार केला, माहिती अधिकारात (आरटीआय) अधिकृत अर्ज दिले. परंतु, जाणीवपूर्वक ही माहिती दडवली जातेय, असा आरोप त्यांनी केला. (Corruption worth 35,000 crore rupees in Kumbh Mela expenditure)

रोहित पवार म्हणाले, जनतेच्या घामाच्या पैशावर डल्ला मारणारे हे महाभाग कोण? आणि त्यांना कोण पाठीशी घालतंय? सरकार माहिती का लपवतंय? हे आम्हाला पहायचंय, पण माहिती दिली नाही म्हणून आम्ही थांबणार नाही. त्यासाठी आज थेट वृत्तपत्रात ‘जाहीर नोटीस’ प्रसिद्ध करून आम्ही कायदेशीर लढाईचं रणशिंग फुंकलं आहे. सर्व कायदेशीर हत्यारांचा वापर करून आम्ही ही लपवलेली माहिती बाहेर काढू. पवित्र कुंभमेळ्याच्या नावाखाली नक्की कुणाचे खिसे भरले गेले, याचा काळाबाजार जनतेच्या न्यायालयात आणल्याशिवाय हा लढा थांबणार नाही, असा इशारा रोहित पवार यांनी दिला. (Corruption worth 35,000 crore rupees in Kumbh Mela expenditure)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!