कोल्हापूर : प्रतिनिधी : पुणे शिक्षक मतदारसंघात एकूण ३० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यापैकी २९ उमेदवार मला हरवण्यासाठी प्रयत्न करत होते, तर मी केवळ विजयी होण्यासाठी लढत होतो. इतिहास घडला नसून, पुढील सहा वर्षांत इतिहास घडवून दाखवीन,” असा ठाम निर्धार पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार कौस्तुभ गावडे यांनी व्यक्त केला. विवेकानंद शिक्षण संस्थेत झालेल्या विजयी मेळाव्यात ते बोलत होते. महाराष्ट्राच्या इतिहासातील विधान परिषदेतील सर्वात तरुण आमदार म्हणून कौस्तुभ गावडे यांच्या निवडीची विशेष चर्चा या मेळाव्यात झाली. त्यांच्या विजयाबद्दल विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी सत्कार करून अभिनंदन केले. (Kaustubh Gawade’s resolve to work for teachers)
शिक्षकांच्या प्रश्नांवर ठोस काम करुन इतिहास घडवेन
विजयी मेळाव्यात मनोगत व्यक्त करताना आमदार कौस्तुभ गावडे म्हणाले, “मतमोजणीच्या काळात मी ४० तास झोपलो नव्हतो; मात्र आता पुढील सहा वर्षे न झोपता काम करून दाखवीन. इतिहास घडला असे म्हणण्यापेक्षा पुढील सहा वर्षांत शिक्षकांच्या प्रश्नांवर ठोस काम करून इतिहास घडवून दाखवीन.”
या विजयी मेळाव्यात आमदार अशोकराव माने (बापू), श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, कोजिमाशिचे तज्ज्ञ संचालक दादासाहेब लाड, टीडीएफचे काटकर सर, विद्यासमितीचे अध्यक्ष डॉ. श्रीराम साळुंखे, प्रभारी प्राचार्य डॉ. महेश गायकवाड, प्राचार्या डॉ. शैलजा साळुंखे, प्राचार्या डॉ. श्रुती जोशी, बाबा पाटील, दत्ता पाटील, प्रा. मधुकर पाटील, प्रा. गीतांजली साळुंखे, मयुरी गावडे यांनी मनोगते व्यक्त केली. (Kaustubh Gawade’s resolve to work for teachers)
या मेळाव्यास मुरलीधर गावडे, आजीव सेवक अजित देसाई, प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे, अनिल कामत, संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य, मुख्याध्यापक, पाच जिल्ह्यांतून आलेले शिक्षक, विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, संस्थाचालक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(Kaustubh Gawade’s resolve to work for teachers)