Home » Blog » कर्जत प्रकल्पाच्या विरोधात  राज ठाकरे, जरांगे पाटलांचाही शड्डू  

कर्जत प्रकल्पाच्या विरोधात  राज ठाकरे, जरांगे पाटलांचाही शड्डू  

by प्रतिनिधी
0 comments
Raj Thackeray and Jarange Patil oppose the Karjat project

जमीर काझी :  मुंबई : रायगड जिल्ह्यातील कर्जत-भीमाशंकर डोंगर (साय डोंगर) परिसरात टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पासाठी करण्यात येणाऱ्या  मोठ्या प्रमाणातील वृक्षतोडीच्या विरोधात मनसेप्रमुख  राज ठाकरे आणि मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे -पाटील यांनीही  शड्डू ठोकला आहे बुधवारी दोघांनी घटनास्थळी पाहणी करत पर्यावरण प्रेमी व ग्रामस्थांच्या भूमिकेला पाठिंबा दिला. (Raj Thackeray and Jarange Patil oppose the Karjat project)

 यावेळी राज ठाकरे यांनी जाहीर सभा घेत राज्य व केंद्र सरकारवर घणाघाती हल्ला करीत मनसे  कोणत्याही परिस्थितीत वृक्षतोड होऊ देणार नाही, असा इशारा दिला.  तर जरांगे- पाटील यांनी वनजीवन व ग्रामस्थांच्या आयुष्य उध्वस्त करणाऱ्या या  प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधानांनी करू नये, असे आवाहन केले.या प्रकल्पासाठी २३ हजारांची कत्तल केली जाणार आहे.त्यामुळे सर्वच स्तरातून त्याला विरोध वाढत चाललेला आहे. आज सकाळी राज ठाकरे व मनोज जरांगे-पाटील यांनी स्वतंत्रपणे घटनास्थळाला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली आहे. 

“शिवरायांचा सह्याद्री उद्ध्वस्त होऊ देणार नाही”

 राज ठाकरे  यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यासमवेत कर्जत तालुक्यातील पाली गावाजवळ असलेल्या मोमालवाडी आणि साय डोंगर परिसरात जाऊन बेकायदेशीर वृक्षकत्तलीची पाहणी केली. त्यांनी स्थानिक ग्रामस्थ आणि आदिवासी बांधवांशी संवाद साधला. “शिवरायांचा सह्याद्री उद्ध्वस्त होऊ देणार नाही” अशी भूमिका घेत त्यांनी सरकारला इशारा दिला असून मनसे कार्यकर्त्यांना वृक्षलागवड व त्यांच्या संगोपनाचे आदेश दिले आहेत.

उद्योजकांना खूष करण्यासाठी वन्यजीवांचा घोट घेण्याचे काम

कर्जत शहरात सायंकाळी जाहीर सभा घेत राज ठाकरे यांनी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , पंतप्रधान नरेंद्र मोदी ,अमित शाह ,राज्य सरकार व केंद्र सरकार यांच्या भ्रष्टाचारी व पर्यावरण विरोधी धोरणावर कडाडून हल्ला चढविला. ते म्हणाले,’राज्य व केंद्रातील सरकार इतके निर्ढावलेले आहे की त्यांना जनाची नाहीतर मनाची सुद्धा आता लाज वाटत नाही.  मुठभर उद्योजकांना खुश करण्यासाठी जनतेच्या वन्यजीवांचा घोट घेण्याचे काम या सरकारकडून सुरू असून आता जनतेला आपली चूक लक्षात येत आहे. त्यामुळे या एकाधिकारीशाही विरोधात सर्वांनी ठामपणे उभे राहावे.  सह्याद्रीतील जंगलाची हानी न होऊ देणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य असून त्यासाठी मनसे प्राणपणाने लढेल आणि या ढोंगी सरकारला घालवल्याशिवाय स्वस्थ  बसणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. (Raj Thackeray and Jarange Patil oppose the Karjat project)

सरकारचा मोठा कट: जरांगे – पाटील 

 मराठा आंदोलक मनोज जरांगे -पाटील यांनी सकाळी कर्जतच्या साय डोंगर क्षेत्राची पाहणी केली. वृक्षतोडीच्या मुद्द्यावर तीव्र संताप व्यक्त करत त्यांनी राज्य सरकारला धारेवर धरले. ते म्हणाले,” वृक्षतोडी मागे  एक मोठा कट  असून ही एकप्रकारे लूट आहे . “पूर्वी इंग्रजांकडूनही एवढा त्रास होत नव्हता, तेवढा यांच्याकडून होत आहे,”  सह्याद्री आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी आपण स्थानिक नागरिकांच्या आंदोलनासोबत खंबीरपणे उभे असल्याचे त्यांनी जाहीर केले.

 ३३ कोटी वृक्ष लागवडीचे काय झाले?, काँग्रेसचा सवाल

कर्जत भिमाशंकर भागात होणारा टोरंटचा प्रकल्प हा पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी करणारा आहे. विकासाला कोणाचाही विरोध नाही, पण मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल करून कसला विकास करणार आहोत. हा प्रकल्प केवळ उद्योगपतीचे चांगभलं करणारा असून हजारो झाडे दुसरीकडे लावण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा हास्यास्पद आहे, असा विनोद राज्याला परडवणारा नसून महाराष्ट्राला झाडखाऊ मुख्यमंत्री नको, असा घणाघाती हल्ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.गुरुवारी सकाळी  कर्जत येथे वृक्षतोडीची पाहणी करून स्थानिक गावक-यांशी संवाद साधणार आहेत.

सह्याद्रीत लाखो झाडे लावण्याची फडणवीसांची भाषा हास्यास्पद

 त्याबाबत टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांचा स्वभाव हल्ली फारच विनोदी झाला आहे, सह्याद्रीच्या भागात लाखो झाडे लावण्याची त्यांची भाषा हास्यास्पद आहे. फडणवीस मुख्यमंत्री असतानाच राज्यात ३३ कोटी झाडे लावण्याचा संकल्प केला होता, ही वृक्ष लागवड कुठे केली हे कोणालच माहित नाही, त्यामुळे त्यांचा हा विनोद राज्याच्या पर्यावरणाला आणि लोकांच्या आरोग्याला पेलणारा नाही. वसुंधरा जपली पाहिजे, जंगल संवर्धन झाले पाहिजे. पण राज्यात खाजगी कंपनीचे चांगभलं करण्यासाठी झाडांची कत्तल सुरु आहे. फडणवीस सरकारच्या काळातच राज्यातील ४० हजार उद्योग बंद पडले, त्याला कोणी विरोध केला नव्हता. फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क प्रकल्पाला कोणी विरोध केला नव्हता तो गुजरातला का गेला? वाढवण बंदर सुद्धा स्थानिकांच्या अधिकारावर गदा आणणारा प्रकल्प आहे. शक्तीपीठ महामार्गाची कोणी मागणी केली नाही तरीही तो प्रकल्प जबरदस्तीने लादला जात आहे, असेही सपकाळ यांनी सांगितले. (Raj Thackeray and Jarange Patil oppose the Karjat project)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!