Home » Blog » पश्चिम बंगालमध्ये नवरात्रोत्सवात देवीला मांसाहारी नेवैद्य

पश्चिम बंगालमध्ये नवरात्रोत्सवात देवीला मांसाहारी नेवैद्य

by प्रतिनिधी
0 comments
Non-vegetarian offerings are presented to the Goddess

देशात सर्वत्र नवरात्र उत्सवाची धामधूम सुरू आहे. देवीची आराधना करण्यासाठी सगळे मग्न आहेत. महाराष्ट्रात नवरात्र उत्सवात अनेक कुटुंबात नवरात्र उत्सवाचा उपवास केला जातो. फळे, दूध, रताळी, खजूरचा नैवेदय देवीला दाखवून फराळ केला जातो. संपूर्ण भारतात नवरात्री उत्सवामध्ये कडक सात्विक अन्नाचे नियम पाळले जात असताना पश्चिम बंगालमध्ये मात्र चित्र वेगळे आहे. खाद्य संस्कृतीसाठी प्रसिद्ध आणि पट्टीचे खवय्ये असलेल्या बंगाल मधील बहुतांशी कुटुंबात नवरात्र आणि दुर्गा पूजेच्या काळात देवीला मासांहारी नैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे.  उत्तर भारतीय नवरात्र उत्सवात सयंमावर भर असतो. उपवासाचे कडक नियम पाळले जाते. फलाहारावर भर देतात.  पण बंगालमध्ये नवरात्र उत्सव हा आनंद, भांग आणि सामुदायिक बंधनाचा काळ मानला जातो. संयमाऐवजी उत्सव, वेळ घालवणे, कुटुंब आणि मित्रांना एकत्र करण्यावर भर दिला जातो. त्यामध्ये नॉनव्हेज पदार्थांची रेलचेल असते. सर्वजण नॉनव्हेज पदार्थावर ताव मारतात. घरात आणि बाहेर पंडालामध्ये देवीचे दर्शन घेण्यासाठी बाहेर पडलेले बंगाली लोक हॉटेल, रेस्टारंट, स्ट्रीट फूड स्टॉलवर मटण, मासे, चिकन पदार्थांची ऑर्डर देतात. (Non-vegetarian offerings are presented to the Goddess)

मांस हे शक्तीचे प्रतिक म्हणून देवीला नैवेद्य

बंगालमधील दुर्गा पूजा ही शाक्त परंपरेने केली जाते. देवी म्हणजे शक्ती, शक्ती म्हणजेच योद्धा. म्हणून देवीला योद्ध्याच्या रुपात पाहतात. प्राचीन काळापासून बंगालमध्ये देवीला प्रसन्न करण्यासाठी प्राण्यांचा बळी देण्याची प्रथा होती. बळी दिलेल्या प्राण्याचे मांस प्रसाद म्हणून भाविकांमध्ये वाटला जाते. देवीला अर्पण केले जाणारे मटण किंवा मासे विशेष पद्धतीने बनवले जातात. ज्याला निरामीश मांस म्हणतात. यामध्ये कांदा आणि लसून यांचा अजिबात वापर केला जात नाही. तांत्रिक आणि शाक्त नियमांनुसार कांदा लसून वर्ज्य मानले असले तरी मांस हे शक्तीचे प्रतिक म्हणून त्याचे पदार्थ देवीला नवैद्य म्हणून अर्पण केले जातात.

देवीला आपली लाडकी लेक मानतात

काही बंगाली कुटुंबात देवीला पराक्रमी देवी न मानता ती आपली लाडकी लेक आहे असे मानतात. नवरात्रीच्या दिवसात ती आपल्या मुलांसह माहेरी म्हणजेच पृथ्वीवर येते अशी त्यांची श्रध्दा आहे. मुलगी खूप दिवसांनी घरी आल्यावर तिचे स्वागत गोडधोड आणि आवडीच्या पक्वानांनी केले जाते. त्याचप्रमाणे माँ दुर्गेचे स्वागत करण्यासाठी घराघरांमध्ये मासे आणि मटणाच् उत्कृष्ट  बेत केले जातात. इलिश मछली, कोशा मांगशो, मटण बिर्याणीचा घमघमाट घरांमध्ये पसलेलेला असता. महाराष्ट्रात गौरी आगमनणानंतर तिच्यासाठी गोडधोड पदार्थ करतात. तर कोकणात अनेक कुटुंबात गौरीला खारा नैवेद्यही दाखवला जातो.

बंगालमध्ये माशांना समृद्धीचे प्रतिक मानले जाते

बंगालमध्ये माशांना अत्यंत शुभ आणि समृद्धीचे प्रतिक मानले जाते. बंगाल हा प्रांत नद्या आणि समुद्रांनी वेढला आहे. तिथे भात आणि मासळी हा प्रमुख आहार आहे. मासे खाणे हा त्याचा आहार नसून मासे खाणे शुभ मानले जाते. प्रगतीचे प्रतिकही मानले जाते. विवाह समारंभ आणि अनेक कार्यक्रमात माशांच्या पदार्थांचा समावेश असतोच. मासे देवीला अर्पण करणे बंगाल पवित्र समजले जाते. (Non-vegetarian offerings are presented to the Goddess)

बकऱ्याचा बळी आणि माशांचा भोग चढवला जातो

अष्टमी आणि नवमीच्या दिवशी अनेक जुन्या जमिनदार घराण्यांमध्ये देवीला विविध प्रकारच्या माशांचा भोग (नैवेद्य) चढवला जातो. दसऱ्याच्या दिवशी इलीश (हिल्सा) किंवा इतर मासे खाणे आणि देवीला अर्पण करणे अत्यंत प्रवित्र मानले जाते. अनेक मंदिरात बकऱ्यांचा बळी दिला जातो. बकरा हा अहंकार, राग आणि लालची प्रवृत्तीचा मानला जातो. म्हणून त्याला देवीच्या चरणी अर्पण केले जाते अशी प्रथा आहे. अनेक मंदिरात बळी देण्याची प्रथा बंद केली जात असून त्या ठिकाणी नारळ,ऊस, तांबडा भोपळा कापला जातो

पंडालात मात्र शाकाहारी नैवेद्यच

बंगालमध्ये फक्त घरांमध्ये देवीला मासांहार दाखवला जातो. सार्वजनिक ठिकाणी असलेल्या दुर्गा मुर्तीच्या प्रतिष्ठापना केलेल्या पंडालात किंवा मंडपात मात्र शाकाहारी नेवैद्य असतो. सुवासिक तांदळाची खिच्युरी, मिश्र भाज्या असलेली लाबवडा, चटणी, पायश नावाची खीर याचा नैवद्य दाखवला जातो. वेगवेगळ्या मिठायांची रेलचेल असते.

महाराष्ट्रात जागर, खंडे नवमीला मासांहाराचा नैवेद्य

महाराष्ट्रातही अनेक कुटुंबात देवीला जागर आणि खंडे नवमीला मासांहाराचा नैवेद्य दाखवला जातो. बंगालसारखीच प्रथा कोल्हापूरमध्येही आहे. नवरात्र उत्सवात भवानी मंडपात तुळजाभवानी मंदिरासमोर नऊ दिवस बकऱ्याचा बळी दिला जातो. बकऱ्याचे मटण प्रसाद म्हणून देवीच्या मानकऱ्यांना वाटला जातो. राजर्षी शाहू महाराजांनी भवानी मातेला मटणाचा पुलाव म्हणून नेवैदय दाखवावा असा आदेशच काढला होता. (Non-vegetarian offerings are presented to the Goddess)

बंगालमध्ये घरोघरी नवरात्रोत्सवात केले जाणार पदार्थ

कोशा मंगशो – हळू-हळू, रसाळ चवीने शिजवलेले मांस

माछेर झोल – फिश करी (रोहू, इलिश, कतला मासा इ.)

इलिश माछ भाजा – बंगालचा प्रसिद्ध हिलसा मासा तळून केलेला पदार्थ

चिंग्री मलाई करी – कोळंबी (प्रॉन्स) नारळाच्या दुधात बनवलेली करी

मटन करी – मसालेदार मटण करी

चिकन करी / डो पियाझा – सणासुदीला बनवली जाणारी चिकन डिश

फिश कटलेट / चॉप्स – बंगाली स्नॅक्समध्ये प्रसिद्ध

पोस्टो – काही वेळा भाज्यांसोबत मासे-मांसातही वापरले जाते

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!