Home » Blog » प्रॅक्टिस फुटबॉल क्लबच्या २०० खेळाडूंचा होणार गौरव

प्रॅक्टिस फुटबॉल क्लबच्या २०० खेळाडूंचा होणार गौरव

by प्रतिनिधी
0 comments
Felicitation of 200 players from Practice Football Club

कोल्हापूर : प्रतिनिधी : शतकमहोत्सवी वर्ष साजरे करणाऱ्या कोल्हापूरच्या फुटबॉल विश्वातील बलाढ्य संघ प्रॅक्टिस फुटबॉल क्लबच्या २०० आजी माजी खेळाडूंच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे. सात ऑक्टोबर रोजी खासदार धनंजय महाडिक, ऑल इंडिया फुटबॉल असोसिएशनचे संचालक मालोजीराजे छत्रपती, आमदार चंद्रदीप नरके, आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते खेळाडूंचा सन्मानचिन्ह देऊन प्रॅक्टिस गौरव पुरस्काराने सत्कार करण्यात येणार आहे. (Felicitation of 200 players from Practice Football Club)

प्रॅक्टिस फुटबॉल क्लबचे अध्यक्ष नितीन सावंत आणि सचिव रमेश मोरे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. प्रॅक्टिस क्लबची स्थापना १९२७ मध्ये झाली असून गेली १०० वर्षे अनेक खेळाडूंनी क्लबसाठी योगदान दिले आहे. प्रतिकुल परिस्थितीत आणि सोयी सुविधांचा अभाव असतानाही प्रचंड जिद्द, संघर्ष, आणि क्लबवर निष्ठा ठेऊन खेळाडूंनी संघांसाठी योगदान दिले. त्याचबरोबर प्रत्येक खेळाडूंने पुढील पिढीला फुटबॉल खेळाची आवड प्रॅक्टिस क्लबवरील निष्ठेची शिकवण दिली. १०० वर्षाच्या काळात चार पिढ्यातील खेळाडूंनी संघासाठी योगदान दिले असून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी खेळाडूंचा गौरव करण्यात येणार आहे. सर्वात जेष्ठ ९४ वर्षाच्या खेळाडूपासून सध्या खेळत असलेल्या खेळाडूंचा सत्कार करण्यात येणार आहे. (Felicitation of 200 players from Practice Football Club)

शिरोली टोल नाक्याजवळील द रामकृष्ण हॉल येथे बुधवारी सायंकाळी साडेचार वाजता होणाऱ्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्यासह कोल्हापूर महानगरपालिका परिवहन समिती सभापती सत्यजीत जाधव, नगरसेविका जयश्री चव्हाण, माधुरी किरण नकाते, नीलांबरी साळोखे उपस्थित राहणार आहेत. पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष संतोष महाडिक, चंद्रशेखर देशपांडे, विजयराव जाधव, राजेंद्र वायचळ, मारुती सावंत, अनिल महाजन उपस्थित होते. (Felicitation of 200 players from Practice Football Club)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!