Home » Blog » ”शिंदे-फडणवीसांनी मराठा समाजाची वाट लावली”; मनोज जरांगेंचा घणाघात 

”शिंदे-फडणवीसांनी मराठा समाजाची वाट लावली”; मनोज जरांगेंचा घणाघात 

by प्रतिनिधी
0 comments
Jarange levels allegations against Fadnavis and Shinde

जमीर काझी : मुंबई : मराठा समाज आंदोलक मनोज जरांगे -पाटील यांनी पुन्हा एकदा  राज्य सरकार विरोधात एल्गार पुकारला आहे. समाजाच्या विविध मागण्यासाठी त्यांनी शनिवारपासून  अंतरवाली सराटीमध्ये बेमुदत आंदोलन सुरु केले आहे. राज्यभरातील समाज बांधवांना एकत्रित येण्याचे आवाहन केले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाची वाट लावली आहे. माझ्या लेकरांचा तळतळाट घेतला आहे, मागण्यांची पूर्तता न केल्यास प्रसंगी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यात घुसू , इशारा दिला आहे. (Jarange levels allegations against Fadnavis and Shinde)

जात पडताळणी प्रमाणपत्र समिती रद्द करावी, गॅझेटियरमध्ये सापडलेल्या ५८ लाख नोंदीनुसार कुणबी प्रमाणपत्र द्यावे, आदी प्रमुख मागण्यासाठी  मनोज जरांगे यांनी एक महिन्यापूर्वी  इशारा दिला होता. मागण्याची पूर्तता न केल्याने आजपासून त्यांनी आंतरवाली सराटीत उपोषण सुरू केले.

सरकारने मराठा समाजांच्या मुलांचे वाटोळे केले

यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर मराठा समाजाच्या मुलांचे वाटोळं केल्याचा आणि त्यांचा तळतळाट घेतल्याचा गंभीर आरोप केला.ते म्हणाले ‘माझ्या समाजाच्या लेकरांचं वाटोळं करून तुमची मुले सुखी ठेवू नका आणि आम्ही ती राहूही देणार नाही.  मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन थांबणार नाही.

शेवटचं आणि निर्णायक आंदोलन

कधी न मिळणाऱ्या ५८ लाख नोंदी सापडल्याने लाखो पोरांचं कल्याण झालं. आता राहिलेल्या नोंदींची अंमलबजावणी करायची आहे. प्रत्येक वेळी सरकारकडून आश्वासन मिळाले, राहिलेल्या मागण्यांची अंमलबजावणी करण्यासाठी हे शेवटचं आणि निर्णायक आंदोलन आहे.”असा इशारा त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. (Jarange levels allegations against Fadnavis and Shinde)

दगा फटका होण्याची शक्यता

“आता काही नंतर नाही. सर्व काही इथेच, जागेवर द्या,” अशी भूमिका जरांगे यांनी मांडली. ते म्हणाले, ”मराठा समाजानं गाफील राहू नये, सावध रहावे.  दगा-फटका होण्याची शक्यता असल्याचा इशाराही त्यांनी दिला. मी मराठ्यांच्या लेकरांसाठी जीव द्यायला तयार झालो आहे. बलिदान गेलेल्या परिवारातील सदस्याला शासकीय नोकरी द्यावी. तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही.”

कुणबी प्रमाणपत्र न मिळालेल्यांनी आंतरवालीत यावं

मनोज जरांगे पाटील म्हणाले, ‘‘कुणबी प्रमाणपत्र न मिळालेल्या मराठा समाज बांधवांनी तसेच हैदराबाद गॅझेटिअरनुसार अर्ज स्वीकारण्यात न आलेल्यांनी आंतरवालीत यावं. सारथीच्या माध्यमातून सुरू असलेल्या योजनांचे पैसे, तसंच पीएचडीचे थांबलेले पैसे तातडीनं द्यावेत. मराठा विद्यार्थ्यांकडून आकारलेली फीही सरकारनं तत्काळ परत करावी”, अशी मागणी त्यांनी केली.

पोलिस कारवाई झाल्यास गंभीर परिणाम

 मराठा समाजाच्या मागण्या आंतरवाली सराटीत पूर्ण झाल्या नाहीत तर मुंबईकडे जाण्याचा इशारा जरांगे यांनी दिला. ”पोरांनो धीर धरा, मुंबईला जाऊ. वर्षा बंगल्यावर जाऊ. मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून कारवाई झाली तर त्याचे गंभीर राजकीय परिणाम होतील”, असा इशाराही त्यांनी दिला आहे. (Jarange levels allegations against Fadnavis and Shinde)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!