Home » Blog » महाराष्ट्रातील सहकारी बँकांचे अस्तित्व मोडून काढण्याचे अमित शाहांचे षढयंत्र

महाराष्ट्रातील सहकारी बँकांचे अस्तित्व मोडून काढण्याचे अमित शाहांचे षढयंत्र

by प्रतिनिधी
0 comments
Amit Shah's conspiracy to dismantle cooperative banks

मुंबई : प्रतिनिधी : केंद्रीय मंत्री अमित शाह नॅशनल को ऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कार्पोरेशन सुधारणा विधेयकाच्या आडून महाराष्ट्रातील सहकार चळवळ आणि नागरी सहकारी बँकाचे अस्तित्व मोडून काढण्याचे षढयंत्र रचत आहेत, असा आरोप शिवसेचे खासदार संजय राऊत यांनी केला. पावसाळी अधिवेशनात हे विधेयक गोंधळात आणि घाईघाईने मंजूर करण्यात आले आहे. राऊतांनी केलेल्या आरोपामुळे खळबळ उडाली आहे. (Amit Shah’s conspiracy to dismantle cooperative banks)

महाराष्ट्रातील बँकांवर वर्चस्व मिळवण्यासाठी घाईघाईने विधेयक मंजूर

संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत अमित शाह यांना नागरी बँकांच्या अस्तित्वाबाबत मराठीतून पत्र लिहिले असल्याचे सांगितले. अमित शाह संसदेत आले नाहीत पण मुंबईत नॅशनल अर्बन को ऑपरेटिव्ह फायनान्स अन्ड डेव्हलपमेंट कार्पोरशनच्या उद्घाटनाला उपस्थित होते. ही संस्था सर्व नागरी सहकारी बँकांची प्रमुख बँक म्हणून काम करेल असे शाह यांनी जाहीर केले. या निर्णयाचा फटका महाराष्ट्रातील नागरी बँकांना बसणार आहे. महाराष्ट्रातील बँकांवर वर्चस्व मिळवण्यासाठी किंवा बंद पाडण्यासाठी नऊ ऑगस्ट रोजी संसदेत एक विधेयक घाईघाईने मंजूर करुन घेण्यात आले याकडे राऊतांनी लक्ष वेधले. (Amit Shah’s conspiracy to dismantle cooperative banks)

गप्प बसून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा पाठिंबा

गुजरातमधील एका घोटाळ्यात अडकलेल्या बँकेला वाचवण्यासाठी, भ्रष्टाचार दाबवण्यासाठी तिचे विलीनीकरण नॅशनल अर्बन को ऑपरेटिव्ह फायनान्स अन्ड डेव्हलपमेंट कार्पोरशन मध्ये करण्यात आले. राज्यातील नागरी बँका धोक्यात आणणारा निर्णय घेतला जात असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गप्प बसून पाठिंबा देत आहेत, असा आरोपही राऊत यांनी केला.  

महाराष्ट्रातील सहकार चळवळ गुजरातच्या दावणीला बांधण्याचा डाव

अमित शाह जाता जाता महाराष्ट्रावर मोठा दरोडा टाकण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप राऊतांनी केला आहे. हजारो लोकांची रोजीरोटी या सहकार क्षेत्रावर अवलंबून आहे. गुजरातच्या घशात सर्व काही घालण्याचा आणि अमित शाह यांच्या मर्जीतील संस्थांचा फायदा करुन देण्यासाठी हा सर्व प्रंपच सुरू आहे. महाराष्ट्राची सहकार चळवळ कुमकुवत करुन ती गुजरातच्या दावणीला बांधण्याचा हा केंद्र सरकारचा गुजरात केंद्रीत डाव आहे असा आरोपही राऊत यांनी केला. (Amit Shah’s conspiracy to dismantle cooperative banks)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!