Home » Blog » भारताचा श्रीलंकेवर १६५ धावांनी विजय; मानव सुधारच्या फिरकीवर लंकेची भंबेरी

भारताचा श्रीलंकेवर १६५ धावांनी विजय; मानव सुधारच्या फिरकीवर लंकेची भंबेरी

by प्रतिनिधी
0 comments
India defeats Sri Lanka by 165 runs

कोलंबो : पहिल्याच कसोटी क्रिकेट सामन्यात यजमान श्रीलंकेवर १६५ धावांनी दणदणीत विजय मिळवत भारताने कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. भारताच्या कसोटी इतिहासातील हा ६०० वा सामना होता. पहिल्या डावात शतकी खेळी (१६७ धावा) करणाऱ्या देवदत्त पडिक्कलची सामनावीर म्हणून निवड झाली. शुभमन गिलने भारतीय संघाचे नेतृत्व केले. भारताचा हा सलग सहावा कसोटी विजय आहे. (India defeats Sri Lanka by 165 runs)

मानव सुधारच्या षटक ठरले टर्निंग पॉईंट

आज बुधवारी शेवटच्या दिवशी भारताला विजयासाठी सहा गडी बाद करण्याची आवश्यकता होती. पण श्रीलंकेन फलंदाजी चिवटपणा दाखवला. पण सामन्याचे ७६ वे षटक टर्निंग पॉईंट ठरले. फिरकी गोलंदाज मानव सुधारने सोनल दिनूशाला ८४ धावांवर बाद करत विजयातील अडसर दूर केला. त्यानंतर प्रभात जयसूर्या आणि लाहिरु कुमारला बाद करत लंकेचा डाव उद्धवस्त केला. या सामन्यात मानवने १० बळी मिळवण्याची किमया केली. दुसऱ्या डावात ५५ धावांत ६ तर पहिल्या डावात ४ गडी बाद केले. श्रीलंकेचा डाव २०६ धावांवर आटोपला. सोनल दिनूशाने सर्वांधीक ८४ धावां केल्या. पहिल्या डावातही त्याने शतक झळकावले होते. त्याची खेळी व्यर्थ ठरली पण श्रीलंकेच्या समर्थकांना आनंद मिळवून देणारी ठरली. धनंजय डी सिल्वाने ५९ धावा केल्या. (India defeats Sri Lanka by 165 runs)

पहिल्या डावात पडिक्कलचे शतक

भारताने पहिल्या डावात ४६२ धावा उभारल्या होत्या. देवदत्त पडिक्कलने दीड शतकी खेळी करताना १६७ धावा केल्या होत्या. केएल राहूलने ८२ धावा केल्या. श्रीलंकेला पहिल्या डावात २८४ रोखण्यात यश मिळाले. त्यामुळे भारताला मोठी आघाडी मिळाली. भारताने दुसऱ्या डावात १९३ धावा केल्या. सर्वाधीक ६६ धावा ऋषभ पंतने केल्या. (India defeats Sri Lanka by 165 runs)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!