जमीर काझी : मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचे भाचे कॅप्टन अमोल महाडिक यांनी शुक्रवारी आपल्या सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांना प्रोफेशनल काँग्रेस विभागात काम करण्याची संधी देण्यात येत आहे. त्यांच्या अनुभवाचा पक्षालाही फायदाच होईल”असे सांगितले. (Sunil Tatkare’s nephew joins the Congress party)
यावेळी अमोल महाडिक म्हणाले,’ आमचे कुटुंब काँग्रेस विचाराचेच असून आजोबा दत्ताजीराव उर्फ आण्णासाहेब तटकरे हे काँग्रेस पक्षाचे नेते होते. काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने घरी आल्यासारखे वाटत आहे. राहुल गांधी यांचे नेतृत्वच देशाला तारु शकणार आहे म्हणून काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
राहूल गांधींना देशभरातून पाठिंबा
प्रदेशाध्यक्ष सपकाळ म्हणाले,’देशात लोकशाही व संवैधानिक मुल्ये पायदळी तुडवत भाजपा सरकारचा मनमानी कारभार सुरु असून ते देशासाठी अंत्यत घातक आहे, म्हणून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोठा लढा पुकारला आहे. हुकूमशाही प्रवृत्तींच्या हातून देश वाचवणे हे सर्वात महत्वाचे आहे. राहुल गांधी यांनी सुरु केलेल्या लढाईला देशभरातून पाठिंबा मिळत आहे. (Sunil Tatkare’s nephew joins the Congress party)
सरकार घाण पसरवत आहे
पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की,’ अन्न व औषध विभागाने राज्यात स्वच्छता मोहिम हाती घेत कडक कारवाई सुरु केली आहे. जेथे जेथे अस्वच्छता, घाण पसरली आहे ती साफ झालीच पाहिजे. ज्या हॉटेल वा कॅन्टिनमध्ये अस्वच्छता दिसते व घाणीचे साम्राज्य दिसते त्याचा परवाना रद्द केला जात आहे, तसेच या सरकारवरही कारवाई झाली पाहिजे. हे सरकारच घाणीतून आले असून सगळीकडे घाण पसरवत आहे म्हणून या सरकारचाच परवाना रद्द केला पाहिजे.
सरकारने जरांगेंना यापूर्वी दिलेली आश्वासने जाहीर करावीत
मनोज जरांगे यांच्या उपोषणावर बोलताना सपकाळ म्हणाले की,’ महायुती सरकारने त्यांना दोनवेळा आश्वासन दिल्याने त्यांनी आंदोलन मागे घेतले तरीही त्यांना पुन्हा आंदोलन करावे लागत आहे. सरकारने याआधी त्यांना कोणती आश्वासने दिली होती ती जाहीर करावीत. हे सरकारच खोटारडे असून मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत धनगर समाजाच्या आरक्षणाच्या फाईलवर सही करणार पासून सुरु झालेला हा प्रवास फसवा आहे. आरक्षणाच्या नावावर जाती-जातीत भांडणे लावणे हाच धंदा भाजपा महायुती सरकारचा आहे. सरकारला जर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावायचा असेल तर जातनिहाय जनगणना करावी, ही काँग्रेस पक्षाची मागणी मान्य करावी, असेही त्यांनी सांगितले. (Sunil Tatkare’s nephew joins the Congress party)