मुंबई : प्रतिनिधी : खासदार प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता. पण उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी त्यांचा डाव उधळून लावला, असा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला. पक्षाच्या घटनेत बदल करण्याचे पत्र पटेल, तटकरे जोडीने निवडणूक आयोगाला पाठवले होते, अशी माहिती आमदार पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Tatkare and Patel’s plot to take control of the party)
रोहित पवार पत्रकार परिषदेत म्हणाले, अजित पवारांचे २८ जानेवारीला निधन झाले. त्यानंतर अवघ्या १८ दिवसांनी १६ फेब्रुवारी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी निवडणूक आयोगाला सह्यांचे पत्र दिले. या पत्राद्वारे त्यांनी संविधानात बदल केल्याचे खोटे सांगितले. पक्षाचे सर्व अधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेलांना देण्याची मागणी केली. हे पत्र लिहिताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांना विश्वासात घेतले नव्हते. सुनेत्रा पवार राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर त्यांना १६ फेब्रुवारीच्या पत्राची कुणकुण लागली. त्यानंतर त्यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून २८ जानेवारी ते त्यांच्या अध्यक्षपदापर्यंत झालेला कोणताही पत्रव्यवहार ग्राह्य धरु नये अशी विनंती केली, अशी माहिती रोहित पवार यांनी दिली. या पत्रामुळे पटेल तटकरेंचा डाव उधळून टाकला का अशी चर्चा सुरू झाली. (Tatkare and Patel’s plot to take control of the party)
२६ फेब्रुवारीला एक पत्र निवडणूक आयोगाला देण्यात आले. त्यावर पटेल आणि तटकरेंच्या सह्या असून त्यामध्य आमच्या पक्षाची घटना बदलली आहे, असा उल्लेख आहे. जर पक्षाला राष्ट्रीय अध्यक्ष नसेल तर कार्यकारी अध्यक्षाकडे अधिकार असतील. ते सर्व निर्णय घेतील, असे पत्रात म्हटले आहे. हे पत्र निवडणूक आयोगाला पाठवल्याचे कळताच राष्ट्रीय अध्यक्ष होईपर्यंत कोणताही पत्रव्यवहार विचारात घेऊ नये असे पत्र सुनेत्रा पवारांनी आयोगाला लिहिले आहे, अशी माहिती रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत दिली. (Tatkare and Patel’s plot to take control of the party)