Home » Blog » सरकारला प्रश्न विचारणाऱ्यांना धमकी देणे मुख्यमंत्र्यांना शोभत नाही

सरकारला प्रश्न विचारणाऱ्यांना धमकी देणे मुख्यमंत्र्यांना शोभत नाही

by प्रतिनिधी
0 comments
Sapakal criticizes the Chief Minister over the threat issue

जमीर काझी :  मुंबई  : सरकारच्या भ्रष्ट कामावर सर्वसामान्य जनता व विरोधी पक्ष बोलत असेल तर त्यांना ‘भाडे के तट्टू’, ‘बघून घेईन’ अशा धमक्या देणे राज्याचे  मुख्यमंत्री यांना शोभत नाही. जनतेच्या पैशाच्या हिशोब जनता विचारणारच, त्यांची भाषा अत्यंत निषेधार्ह व आक्षेपार्ह आहे. ‘तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही’, असा घणाघाती हल्ला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. (Sapakal criticizes the Chief Minister over the threat issue)

डिझास्टर मॅन म्हटल्याने मुख्यमंत्र्यांना जिव्हारी लागले

प्रसार माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की,’ सुसंस्कृत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या तोंडी ‘कुत्रे’, ‘भाड्याचे तट्टू’ असे शब्द शोभा देत नाहीत. ही ‘टपोरी’ लोकांची भाषा आहे. सरकारच्या कामावर बोलणे हे लोकशाहीत चुकीचे नाही.  फडणवीस यांना संताप येण्याचे कारण म्हणजे काँग्रेस पक्षाने मिसिंग लिंकच्या भ्रष्ट कामाची पोलखोल केली व ‘इंन्फ्रा मॅन’ म्हणून ते टेंभा मिरवतात त्यांना ‘डिझास्टर मॅन’ म्हटले हे त्यांच्या जिव्हारी लागले आहे. मी केलं, मी केलं, अशी स्वताची पाठ थोपटून घेणाऱ्या फडणवीसांना ते रुचले नाही. पण त्यांनी काय त्यांच्या घरच्या पैशातून काम केले का, हा तर जनतेचा पैसा आहे, तो जर वाया जात असेल तर लोक प्रश्न विचारणारच, त्यामुळे  फडणवीस यांनी हा अहंकार दाखवणे बरे नाही, असेही  सपकाळ यांनी म्हटले आहे. (Sapakal criticizes the Chief Minister over the threat issue)

सर्व ज्ञान आपल्याकडे असल्याचा फडणवीसांचा हेका

मिसिंग लिंकच्या संदर्भात फडणवीस यांना ‘डिझास्टर मॅन’ म्हटल्याने ते, ज्याला काही समजत नाही, अक्कल नाही, त्यावर काय बोलणार असे ते म्हणाले, सर्व ज्ञान त्यांच्याकडेच आहे हा फडणवीस यांचा हेका आहे. फडणवीस यांनी माझ्यावर खोटेपणाचा आरोप केला आहे पण खोटे कोण बोलत आहे, त्यासाठी मी नार्को टेस्टला तयार आहे तुम्ही तयार आहात का, असा प्रश्न सपकाळ यांनी विचारला आहे.

फडणवीसांची नार्को टेस्ट करा

नाशिकमध्ये काँग्रेसचे आंदोलन होऊ नये म्हणून ढगफुटीची अफवा फडणवीस यांनीच पसरवली होती. वेगळा विदर्भ, आरक्षण, लाडकी बहिण यांच्याबद्दल खोटे कोण बोलले, समृद्धीत किती कोटींचा भ्रष्टाचार झाला, मिसिंग लिंकमध्ये किती भ्रष्टाचार झाला, मुंबईतील जमीन कोणाला विकल्या हे  महाराष्ट्राच्या जनतेला समजू द्या, त्यासाठी नार्को टेस्ट करा, असे आव्हानही सपकाळ यांनी दिले.

महायुती सरकार शेतकरीविरोधी

भाजपा महायुती सरकारने केलेली शेतकरी कर्जमाफीची घोषणा फसवी आहे हे आम्ही सुरुवातीपासून सांगत आलो आहोत. सरकारने घोषणा केली पण अद्याप कर्जमाफी केलेली नाही, त्यासाठी राज्यात विविध ठिकाणी काँग्रेस व मित्रपक्ष आंदोलन करत आहेत. सरकार चर्चेला बोलावते पण चर्चाच करत नाही. भाजपा महायुती सरकार हे शेतकरी विरोधी आहे, असेही त्यांनी सांगितले. (Sapakal criticizes the Chief Minister over the threat issue)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00