Home » Blog » इराण फुटबॉल संघाला अमेरिका सोडून जाण्याचे आदेश

इराण फुटबॉल संघाला अमेरिका सोडून जाण्याचे आदेश

by प्रतिनिधी
0 comments
New Zealand vs. Iran match ends in a draw

नवी दिल्ली : युद्धग्रस्त इराण फुटबॉल संघाने फिफा वर्ल्डकप स्पर्धेत न्यूझिलंडला २-२ बरोबरीत रोखत जिगरबाज खेळाचे प्रदर्शन दाखवले. पण सामना संपल्यानंतर त्यांना ताबडतोब अमेरिका सोडण्याचे आदेश दिल्याने इराणचे प्रशिक्षक आणि खेळाडू संतापले आहेत.

अमेरिका आणि इराणमध्ये युद्धजन्य स्थितीमुळे इराण संघावर मोठा परिणाम झाला आहे. अमेरिका यजमान देश असल्याने या संघातील खेळाडूंना व्हिसा मिळण्यासही अडचण निर्माण झाली. इराण संघाचा सरावही कडक बंदोबस्तात मेक्सिकोत सुरू आहे. सोमवारी लॉस एंजेलिसमधील सोफी स्टेडियमवर इराण आणि न्यूझिलंड यांच्यातील पहिला सामना चुरशीचा आणि रोमांचक झाला. या सामन्यात इराणने जिगरबाज खेळाचे दर्शन घडवत सामना २-२ असा बरोबरीत राखला. (New Zealand vs. Iran match ends in a draw)

सामना संपल्यानंतर विमानात बसा आणि अमेरिकेतून निघून जा असा आदेश इराण संघाला देण्यात आला. मेक्सिकोतील तिजुआना येथील त्यांच्या प्रशिक्षण स्थळावर परत जाण्याचे आदेश दिले. सामन्यानंतर इराणचे प्रशिक्षक अमीर घोलनाई यांनी नाराजी व्यक्त केली. घोलनाई यांच्या म्हणणाऱ्या संघ दुसऱ्या दिवशी परतण्यापूर्वी कॅलिफोर्निया रात्री विश्राम करणार होता. पण सामन्यानंतर त्यांना लगेच परतावे लागणार आहे. सामन्यानंतर विश्रांती घेणे अत्यंत महत्वाचे असते. पण आम्हाला विमानात बसून तिजुआनामधील आमच्या शिबिरात परत जाण्यास सांगितल्याने आम्ही अस्वस्थ आहोत, असे घालेनाई यांनी सांगितले.

इराणचा कर्णधार मेहदी तारेमी यानेही नाराजी व्यक्त केली. इराणी फुटबॉल फेडरेशनचे अधिकारी, सपोर्ट स्टाफ आणि माध्यम प्रतिनिधीसह शिष्टमंडळातील अनक सदस्यांना व्हिसा नाकारला याकडे त्याने लक्ष वेधले. (New Zealand vs. Iran match ends in a draw)

न्यझिलंडला इराणने बरोबरीत रोखले

  न्यूझिलंडच्या एलिजा जस्टने दोन गोल मारले. त्याने सातव्या आणि ५४ व्या मिनिटाला गोल केले. कर्णधरा ख्रिस वूडने त्याला पास दिले. इराणने पहिल्या आणि दुसऱ्या हाफमध्ये गोल केले. पहिल्या हाफमध्ये रामिन रझाईने बरोबरी साधली. त्यानंतर मोहम्मद मोहब्बीने इराणचा दुसरा गोल केला आणि सामना बरोबरीत आणला. इराणचा समावेश जी गटात असून त्यांचा पुढील सामना रविवारी बेल्जियमबरोबर सोफी स्टेडियमवर होणार आहे. त्यामुळे इराण संघाला मेक्सिकोतून पुन्हा लॉस एंजिल्समध्ये यावे लागणार आहे. (New Zealand vs. Iran match ends in a draw)

You may also like

error: Content is protected !!