Home » Blog » हवाई दलाचे विमान कोसळले; पाच जवानांचा मृत्यू

हवाई दलाचे विमान कोसळले; पाच जवानांचा मृत्यू

by प्रतिनिधी
0 comments
Indian Air Force plane crashes in Assam

नवी दिल्ली : आसाममध्ये भारतीय हवाई दलाचे विमान कोसळले. शनिवारी सकाळी ही घटना घडली. हे विमान जोरहाट हवाई तळावर उतरण्याचा प्रयत्न करत असताना कोसळले. या अपघातात पाच जवांनाचा मृत्यू झाला. विमान अपघाताच्या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहे. (Indian Air Force plane crashes in Assam)

प्रशांत सिंग, शुभम कुमार, जितेंद्र शर्मा, खेमाराम कुमावत, दानिश आलम अशी मृत्यूमुखी पडलेल्या जवानांची नावे आहेत. आयएफएफच्या म्हणण्यानुसार उड्डाणादरम्यान विमान धावपट्टीच्या बाहेर कोसळले.

भारतीय हवाई दलाचे एनएन-३२ हे वाहतूक विमान आहे. सरंक्षक जनसंपर्क अधिकारी लेफ्टनंट कर्नल एम.रावत यांनी या घटनेची पुष्टी केली असून झालेल्या नुकसान अंदाज घेतला जात आहे अशी माहिती दिली. विमान अपघातानंतर घटनास्थळी आग विझवण्याचे काम सुरू आहे. हवाई दलाने स्क्वॉड्रन लीडर प्रशांत सिंग, फ्लाइट लेफ्टनंट शुभम कुमार, सार्जंट जितेंद्र शर्मा, अग्निवीरवायू खेमाराम कुमावत आणि अग्निवीरवायू दानिश आलम अशी मृत जवानांची ओळख पटवली. (Indian Air Force plane crashes in Assam)

अहमदाबाद येथील विमान अपघाताला नुकतेच् एक वर्षे पूर्ण झाले आहे. या अपघातात अनेकांचा बळी गेला होता. पण अजुनही या अपघाताचे कारण पुढे आलेले नाही. राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांचाही विमान अपघातात मृत्यू झाला होता. पण या अपघाताच्या तपासातही प्रगती झालेली नाही. (Indian Air Force plane crashes in Assam)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00