Home » Blog » पतीचा खून करुन तिने देवाची क्षमा मागितली…    

पतीचा खून करुन तिने देवाची क्षमा मागितली…    

by प्रतिनिधी
0 comments
Husband murdered by wife in Bhopal

भोपाळ : प्रतिनिधी : कौटुंबिक अत्याचाराला कंटाळून २७ वर्षीय महिलेने ठार मारले. पतीची मृतदेहाजवळ आठ तास थांबल्यानंतर देवाची क्षमा मागून ती पोलिसांच्या स्वाधीन झाली. भोपाळमधील छत्तरपूरच्या शिवनगर कॉलनीत ही घटना घडली. (Husband murdered by wife in Bhopal)

पोलिसांनी या घटनेच माहिती दिली. दीनदयाळ कुशवाह (वय ३०) हा गवंडी काम करत होता. तो पत्नीपासून विभक्त रहात होता. सोमवारी सकाळी दारुच्या नशेत तो पत्नीच्या माहेरी आला. त्याने दरवाजाच्या कडी तोडून नीलम कुशवाहच्या घरात जबरदस्तीने प्रवेश केला. त्याने दीनदयाळने नीलमचे केस पकडून बेदम मारहाण केली. तसेच स्वत:च्या सात वर्षाच्या मुलीला शिवगाळ केली. मारहाणीनंतर दारुच्या नशेत असलेला दीनदयाळ जमिनीवर पडला. त्यानंतर जखमी झालेल्या नीलमने काठीने दीनदयाला बेदम मारहाण केली. तिने डोक्यावर आणि पायावर काठीने हल्ला केला. त्यातच दीनदयालचा मृत्यू झाला. दीनदयाय बेशुद्ध झाला आहे अशी निलमची समजूत होती. तिचे आई वडील परत येईपर्यंत आठ तास मृतदेहाशेजारी बसली होती. (Husband murdered by wife in Bhopal)

त्यानंतर तिचे आई वडील घरी आले. त्यांनी दीनदयाल खलास झाला असून पोलिसांना शरण जाण्यासाठी सांगितले. त्यानंतर ती पोलिस ठाण्याकडे निघाली. वाटेत ती हनुमान मंदिरात थांबली. तिथे तिने केलेल्या कृत्याबद्दल क्षमा मागण्यासाठी दहा मिनिटे रडून प्रार्थना केली. रात्री आठ वाजता पोलिस ठाण्यात पोचली. तिने पोलिसांना स्वाधीन करत हत्येची कबुली दिली.

तपासात अत्यंत गंभीर कौटुंबिक हिसांचाराची माहिती पुढे आली आहे. नीलम गेल्या पाच वर्षापासून आई वडिलांसोबत रहात होती. तिने नुकताच घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. दीनदयाळ त्यांच्या दोन अल्पवयीन मुलांचा वारंवार छळ करत होता असा आरोप नीलमच्या कुटुंबियांनी केला आहे. (Husband murdered by wife in Bhopal)

You may also like

error: Content is protected !!