Home » Blog » मविआ विधान परिषदेच्या १७ जागा लढवणार : हर्षवर्धन सपकाळ

मविआ विधान परिषदेच्या १७ जागा लढवणार : हर्षवर्धन सपकाळ

by प्रतिनिधी
0 comments
MVA to contest 17 Legislative Council seats. Harshvardhan Sapkal

जमीर काझी :  मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडणुकीसाठी प्रचंड बहुमतात असलेल्या महायुती सरकारमध्ये एकमत होत नसताना  विरोधी महाविकास आघाडी त्यासाठी सज्ज झाली आहे.  सर्व १६ जागा व नागपूरच्या एका जागेवरील पोटनिवडणूक अशा सर्व १७ जागा  आघाडी मार्फत  लढवणार आहे. त्याबाबत  जागावाटपाची प्राथमिक चर्चा झाली असून सर्वसंमतीने त्याबाबत  निर्णय  घेण्यात  येणार आहे.

‘मविआ’च्या प्रमुख नेत्यांची बुधवारी  विधान परिषद निवडणुकीच्या जागा वाटपासाठी काँग्रेस पक्षाचे मुख्यालय टिळक भवन येथे बैठक झाली. यावेळी  काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ,  शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे  प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, खासदार सुप्रिया सुळे, शिवसेनेचे नेते आमदार अनिल परब, अंबादास दानवे, मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. (MVA to contest 17 Legislative Council seats. Harshvardhan Sapkal)

बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, भाजपा लोकशाही मानत नाही, त्यांनी निवडणुकीत घोडेबाजार मांडला आहे, पैसा फेक तमाशा देख चा दुसरा अंक सुरु झाला असून ५ लाख रुपये आगाऊ देऊन नगरसेवकांची पळवापळवी केली जात आहे, अशा परिस्थितीत लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी महाविकास आघाडी एकजूटपणे विधान परिषदेची निवडणूक लढवणार आहे. मविआमध्ये जागा वाटपावरून कोणताही विसंवाद अथवा तिढा नाही तर सुसंवाद आहे, तर दुसरीकडे ‘गँग्ज ऑफ ट्रिपल इंजिन सरकार’ मध्येच जागा वाटपावरून धुसफुस सुरु आहे, . (MVA to contest 17 Legislative Council seats. Harshvardhan Sapkal)

शेतकऱ्यांच्या एकजूटीपुढे भाजपा सरकार हादरले

कांद्याला ३ हजार रुपये हमीभाव द्यावा या मागणीसाठी नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे महाविकास आघाडीने मोठे आंदोलन केले, तीन तास रास्ता रोको करण्यात आला. भाजपा महायुती सरकारने पोलिसांच्या माध्यमातून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला पण शेतकऱ्यांची एकजूट व ताकदी पाहून फडणवीस सरकार हादरले म्हणूनच आज तातडीने दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यासोबत कांदा प्रश्नावर बैठक होत आहे पण या बैठकीतून रिकाम्या हाताने परत येऊ नका, शेतकऱ्यांसाठी भरीव मदत घेऊनच या, असेही  सपकाळ यांनी यावेळी सांगितले. (MVA to contest 17 Legislative Council seats. Harshvardhan Sapkal)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00