पुणे : प्रतिनिधी : अजित पवारांच्या विमान अपघातानंतर व्हीएसआर विमान कंपनीला १४५ कोटी रुपये दिले आहेत, असा दावा आमदार रोहित पवार यांनी केला. आज बुधवारी पुण्यामध्ये त्यांनी सीआयडी कार्यालयाला भेट देऊन अजित पवार अपघात तपासाप्रकरणी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
रोहित पवार यांनी अपघातासंबधी माहिती घेण्यासाठी तिसऱ्यांदा सीआयडीच्या कार्यालयात आले होते. पण तिथे एकही जबाबदार अधिकारी नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. सरकार आणि तपास यंत्रणा विमान अपघाताचे प्रकरण गांभीर्याने घेत नसल्याचा आरोप त्यांनी केली. (145 Crore Allocated to ‘VSR’ Following Ajit Pawar’s Aircraft Incident)
अजित पवारांच्या अपघातातील विमान व्हीआरएस कंपनीचे होते. या कंपनीला अजित पवारांचा अपघात झाला त्या २८ जानेवारीपासून आजतागारत १४५ रुपये त्यांच्या खात्यात देण्यात आले आहेत. २७ जानेवारी कंपनीला १५ कोटी रुपये तर ज्या दिवशी अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला त्या दिवशी व्ही.के.सिंगला कदाचित बक्षीस म्हणून ९ कोटी ८१ लाख रुपये देण्यात आले. तसेच अजित पवारांच्या अत्यंविधीदिवशी १६ कोटी रुपये देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. (145 Crore Allocated to ‘VSR’ Following Ajit Pawar’s Aircraft Incident)
नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातचा अजित पवारांच्या विमान अपघाताशी संबध जोडताना रोहित पवार यांनी खरातच्या २७, २८ आणि २९ जानेवारी रोजी खरातच्या बँक खात्यात अचानक मोठी आर्थिक उलाढाल का झाली असा प्रश्नही उपस्थित केला. बारामतीतील एक छोटा राजकीय नेता सातत्याने खरातच्या संपर्कात होता. या नेत्याचे इतर मोठ्या नेत्यांशी आर्थिक संबध असून त्यानेच ही सर्व रॅकेट चालवल्याचा संशय आहे असा आरोपही त्यांनी केला. (145 Crore Allocated to ‘VSR’ Following Ajit Pawar’s Aircraft Incident)