Home » Blog » काँग्रेसमुळे आखातातील भारतीयांचे जीव धोक्यात; पंतप्रधान मोदींची टीका

काँग्रेसमुळे आखातातील भारतीयांचे जीव धोक्यात; पंतप्रधान मोदींची टीका

by प्रतिनिधी
0 comments
Lives of Indians in the Gulf at Risk Due to Congress

नवी दिल्ली : काँग्रेसला फक्त राजकारण आणि सत्तेची पर्वा आहे अशी टीका करत आखातातील भारतीयांचा जीव काँग्रेसमुळे धोक्यात आला आहे असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. केरळ विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या तिरुवल्ला हे सभेत बोलताना त्यांनी हा आरोप केला. केरळमध्ये नऊ एप्रिल रोजी विधानसभेच्या सर्व जागांसाठी निवडणूक होत आहे.

काँग्रेसचे नेते धोकादायक वक्तव्ये करत आहेत. त्यामुळे मध्यपूर्वीतील भारतीयांचे जीवन धोक्यात आले आहे असा आरोप केला. अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर आखाती देशांनी भारताला शत्रू मानावे अशी काँग्रेसची इच्छा आहे असा आरोप त्यांनी भाषणात केला. (Lives of Indians in the Gulf at Risk Due to Congress)

काँग्रेसला भिती पसरावयाची असून त्यामुळे त्यांना मोदीवर टीका करण्याची संधी मिळेल असे मोदी म्हणाले. काँग्रेस, एलडीएफ, युडीएफच्या कार्यकर्त्यांना मला हे सांगायचे आहे की निवडणुका येतील, जातील. पण माझ्यासाठी आखातातील लाखो केरळी लोकांची सुरक्षा महत्वाची असून त्यासाठी मी कटिबद्ध आहे असेही ते म्हणाले. (Lives of Indians in the Gulf at Risk Due to Congress)

आखाती देशातील सरकारे भारतीयांना आपले कुटुंब मानतात ही चांगली गोष्ट आहे. भारत आणि आखाती देशांची घट्ट मैत्री आहे याकडेही त्यांनी लक्ष वेधले. भारतात मुर्खपणाने बोलणाऱ्यांनी आपले बोलणे थांबवावे. जेणेकरुन आपल्या तरुण पिढीला आपल्या मुलींना तिथे कोणत्याही त्रासाला सामोरे जावे लागणार नाही. संघर्षाच्या सुरुवातीपासून केंद्र सरकार परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे. (Lives of Indians in the Gulf at Risk Due to Congress)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00