Home » Blog » शेतकरी संकटात असताना संकटमोचक महाजन कुठे आहेत?

शेतकरी संकटात असताना संकटमोचक महाजन कुठे आहेत?

by प्रतिनिधी
0 comments
Where is Mahajan while farmers are in distress

नाशिक : अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असताना संकटमोचक गिरीश महाजन कुठे आहेत?, असा सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला. राऊत हे जळगाव दौऱ्यावर आले असताना पत्रकारांशी बोलताना त्यांनी मंत्री महाजन यांच्यावर टीका केली.

खासदार राऊत म्हणाले, जिल्ह्यात अवकाळी पावसाने शेती उद्धवस्त  झाली असून पिकांचे अतोनात नुकसान झाले. शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला असताही सरकार किंवा पालकमंत्र्यांकडून शेतकऱ्याबाबत संवेदना व्यक्त केली जात नाही. आमदार, मंत्र्याकडून सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी केली पाहिजे. सरकारमधील मंत्र्यांच्या संवेदना ठार झालेल्या आहेत अशी टीका केली. (Where is Mahajan while farmers are in distress)

जळगावमध्ये अवकाळी पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले असल्याने मंत्री महाजन यांच्यावर निशाना साधताना संजय राऊत म्हणाले, कुठे आहेत गिरीश महाजन? ज्यांना आपण संकटमोचक म्हणतो ते संकटावेळी कुठे असतात?. ते फक्त राजकीय संकटमोचक आहेत का?. जेव्हा शेतकऱ्यांवर संकट येतात ते हे संकटमोचक काही करताना दिसत नाहीत. फक्त आमदार, नगरसेवक, पक्ष फोडणे हेच संकटमोचकाचे कर्तव्य आहे का? असा सवालही त्यांनी केला. (Where is Mahajan while farmers are in distress)

जळगावमध्ये राजकीय हुकुमशाही सुरू आहे असा आरोप केला. पोलिसांच्या मदतीने गुंडगिरी सुरू आहे. जळगावमधील पोलिस गणवेशातील हुकमशाही करत असत असून विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी पोलिसांचा वापर होत आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार संकटमोचकांच्या संपर्कात आहेत. पुढची निवडणूक भाजपमधून लढवतील असे वाटते असा टोलाही त्यांनी मारला. (Where is Mahajan while farmers are in distress)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00