नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात क्रुरतेच्या कारणास्तवर पतीने घटस्फोट मागितल्याप्रकरणी सुनावणी झाली. या सुनावणीत पत्नीने घरातील कामे जसे स्वयंपाक करणे ही पुरेशा प्रमाणात न करणे यासारखे आरोप क्रुरता ठरत नाहीत असे तोंडी निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे.
न्यायालयाने स्पष्ट केले आहे की काळ बदलला आहे. पतीनेही स्वयंपाक, धुलाई इत्यादी कामामध्ये हातभार लावला पाहिजे, असे न्यायमूर्ती विक्रम नाथ म्हणाले. तुम्ही मोलकरणीशी विवाह करत नाही आहात. तुम्ही जीवनसाथीशी विवाह करत आहात असे न्यायमूर्ती संदीप मेहता म्हणाले. (Husband must also contribute in cooking)
पुढील तारखेला दोन्ही पक्षांना व्यक्तिश: हजर राहण्यास सांगितले आहे. न्यायालयाने दोन्ही पक्षांमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी झाला.
या खटल्याची माहिती अशी आहे की घटस्फोटाचा अर्ज दाखल करण्यापूर्वी पती पत्नीचा विवाह २०१७ मध्ये झाला. त्यांना आठ वर्षाचा मुलगा आहे. पती सरकारी शाळेत शिक्षक तर पत्नी प्राध्यापिका आहे. पत्नीची आर्थिक परिस्थिती पतीपेक्षा चांगली आहे पण तिने पोटगीची मागणी केलेली नाही. (Husband must also contribute in cooking)
घटस्फोटाच्या प्रक्रियेनंतर पतीने असा आरोप केला आहे की विवाहानंतर एका आठवड्यात पत्नीचे वागणे बदलले. तिने त्याला वाईट वागणूक देण्यास सुरुवात केली. पत्नीने सासू सासऱ्यांच्याविरुद्ध अश्लील भाषा वापरली. त्यांच्यासाठी जेवण बनवण्यास नकार दिला आहे आणि त्यानंतर त्यांना मुलगा झाला. मुलगा झाल्यावर बारशासाठी त्याला आमंत्रित केले नाही.
पत्नीने दावा केला आहे की पती आणि त्यांच्या कुटुंबियांच्या समंतीने बाळतंपणासाठी माहेरी गेले होते. पती बारश्याला उपस्थित राहिला नाही. तिच्या आईवडिलांकडे रोख रक्कम आणि दागिन्यांची मागणी केला. तिला तिचा पगार देण्यास भाग पाडले असा दावा केला आहे.
कौटुंबिक न्यायालयाने पतीची विनंती मान्य केली आणि क्रुरतेच्या कारणास्तव घटस्फोटासाठी परवानगी दिली. पत्नीने उच्च न्यायालयात अपिल केले. उच्च न्यायालयाने घटस्फोटाचा निर्णय रद्द केला. त्यानंतर पतीने या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. (Husband must also contribute in cooking)