Home » Blog » “मोहब्बत हमसे और शादी मोदीजी से’’; खरगेंच्या वक्तव्यावर मोदी खळखळून हसले

“मोहब्बत हमसे और शादी मोदीजी से’’; खरगेंच्या वक्तव्यावर मोदी खळखळून हसले

by प्रतिनिधी
0 comments
Modi laughed at Kharge's remark

नवी दिल्ली : राज्यसभेतील ३७ खासदार आज बुधवारी निवृत्त झाले. निवृत्तीपूर्वी राज्यसभेत त्यांना निरोप देण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित होते. पण यावेळी राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते काँग्रेसचे खासदार मल्लिकार्जुन खरगे यांनी माजी पंतप्रधान देवेगौडा यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याने मोदींनाही हसू आवरले नाही. ते सभागृहात खळखळून हसले. (Modi laughed at Kharge’s remark)

मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, आपल्याला ५४ वर्षे संसदीय कामकाजाचा अनुभव असला तरी शिकण्याची गरज असतेल. कोणीही सर्वज्ञानी नसतो. संसदीय आयुष्यात कटू आणि गोड अनुभव येत असतात. जे सहकारी निवृत्त होत आहेत. त्यातले काही लोक जर परतले तर राज्यसभेला आणखी अनुभवी सदस्यांचे योगदान मिळेल. (Modi laughed at Kharge’s remark)

खरगे यांनी माजी पंतप्रधान देवेगौंडा यांचा उल्लेख करताना म्हणाले, मी देवेगौडा यांना ५४ वर्षापासून ओळखतो. आधी ते आमच्या बरोबरच होते. त्यानंतर ते आमच्यापासून दूर झाले. हे म्हणजे असं झालं की “मोहब्बत हमारे साथ की, और शादी मोदी जी से कर ली” असे म्हणताच संपूर्ण सभागृह हास्यकल्लोळ पहायला मिळाला. पंतप्रधान मोदीनाही हसू आवरता आले नाही. ते खर्गे यांच्या वक्तव्यावर खळखळून हसले. (Modi laughed at Kharge’s remark)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00