Home » Blog » शौचालय घोटाळा मानहानी प्रकरणात संजय राऊत निर्दोष मुक्तता 

शौचालय घोटाळा मानहानी प्रकरणात संजय राऊत निर्दोष मुक्तता 

by प्रतिनिधी
0 comments
Sanjay Raut, defamation case

मुंबई : प्रतिनिधी :  भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नीच्या कंपनीने मीरा भाईदर येथील शौचालय बांधण्यात कोट्यावधीचा घोटाळा केल्याचा आरोप केल्याप्रकरणी ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर दाखल बदनामीच्या खटल्यातून निर्दोष मुक्तता झाली आहे.

शौचालय घोटाळा मानहानी प्रकरणात मुंबई जिल्हा सत्र न्यायालयातील अतिरिक्त न्यायाधीश  महेश जाधव यांनी संजय राऊत यांना सबळ पुराव्याअभावी त्यांना निर्दोष सोडले. सोमय्या यांची पत्नी मेघा सोमय्या यांनी मानहानीचा दावा दाखल केला होता. त्यामध्ये माझगाव कोर्टाने त्यांना दोषी ठरवून शिक्षा सुनावली होती. (Sanjay Raut, defamation case)

खासदार संजय राऊत यांना मुंबई सत्र न्यायालयानं मोठा दिलासा दिलाय. भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांच्याविरोधात दाखल केलेल्या मानहानी प्रकरणात कोर्टाने राऊत यांना सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्त केलं आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश महेश जाधव यांच्यासमोर याप्रकरणी सुनावणी झाली. कथित शौचालय घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांनी मेधा सोमय्यांविरोधात मानहानीकारक वक्तव्य केल्याबद्दल माझगाव कोर्टानं संजय राऊत यांना दोषी ठरवत शिक्षा सुनावली होती. त्याला राऊत यांनी त्याला सत्र न्यायालयात आव्हान दिले होते. (Sanjay Raut, defamation case)

काय आहे शौचालय घोटाळा? – मीरा-भाईंदरमध्ये १५४  सार्वजनिक शौचालय बांधण्यात आली होती. त्यातील १६  शौचालय बांधण्याचं कंत्राट मेधा सोमय्यांच्या युवक प्रतिष्ठानला मिळालं होते. या कामात बनावट कागदपत्र सादर करून मीरा-भाईंदर महापालिकेच्या अधिकाऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप राऊत यांनी केला होता. पर्यावरणाचा ऱ्हास केल्याचे दावा केला होता. (Sanjay Raut, defamation case)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00