Home » Blog » अचलपूर मध्ये भाजप एमआयएम एकत्र!

अचलपूर मध्ये भाजप एमआयएम एकत्र!

by प्रतिनिधी
0 comments
BJP and MIM together in Achalpur

मुंबई : अचलपूर नगरपालिकेच्या विषय समितीच्या निवडणुकीत विषय समित्यांचे सभापती आणि स्थायी समिती सदस्यांची निवड बिनविरोध होण्यासाठी भाजपने एआयएमआयएम हातमिळवणी केल्याची चर्चा आहे. त्यामध्ये भाजपला यश मिळाले आणि एमआयएमला फायदा झाला असून एक सभापतीपद त्यांच्या वाट्याला आले आहे.

गेल्या महिन्यात अचलपूर नगराध्यक्षपदी भाजपचे उमेदवार विजयी झाले. मात्र ४१ सदस्यांच्या नगरपालिकेत काँग्रेसने सर्वाधीक १५ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला. भाजपला नऊ जागा मिळाल्या. अपक्ष दहा जण विजयी झाले. तीन जागा एमआयएम तर राष्ट्रवादी आणि प्रहार जनशक्ती पक्षाला प्रत्येकी दोन जागा मिळाल्या. (BJP and MIM together in Achalpur)

विषय समित्यांची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजपने प्रयत्न केले. पाणीपुरवठा समितीच्या सभापतीपदी काँग्रेसच्या खुर्शिदा बानो अताउल्ला शाह यांची बिनविरोध निवड झाली. बांधकाम समितीपदी महाआघाडीचे दीपाली जंजवाल यांच्याकडे सोपवण्यात आली. आरोग्य समिती सभापतीपदी राष्ट्रवादीचे शरशेर खान बिस्मिला खान यांची तर शिक्षण समिती सभापतीपदी एमआयएमच्या रुखसाना मोहम्मद इसा यांची बिनविरोध निवड झाली. महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी भाजपच्या दुर्गा सोनापुरे यांची निवड झाली. स्थायी समिती सदस्यांमध्ये भाजपचे सुरेंद्रकुमार तांबे, अपक्ष सुशीला इंगळे, काँग्रेसचे मोहम्मद, वंजारा यांचा समावेश आहे. (BJP and MIM together in Achalpur)

दरम्यान सर्व निवडी बिनविरोध झाल्यानंतर भाजप एमआयएम युतीची चर्चा सुरू झाली. त्यावर स्थानिक भाजपचे नेते अभय माथने यांनी इन्कार केला. भाजप हा हिंदूत्वादी पक्ष आहे. आम्ही एमआयएमशी कधीच युती करु शकत नाही. अचलपूरमध्ये एमआयएमचा गटच नसल्याने युतीचा प्रश्नच उद्धभवत नाही असे त्यांनी सांगितले. (BJP and MIM together in Achalpur)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00