नवी दिल्ली : नवीन वर्षात होणाऱ्या आयसीसी टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा आणि न्यूझीलंडविरुद्धचा पाच सामन्याच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. दक्षिण आफ्रिका टी-२० मालिकेत फ्लॉप ठरलेल्या शुभमन गिलला वगळण्यात आले आहे. तर देशांतर्गत स्पर्धेत धडाकेबाज कामगिरी करुन निवड समितीचे लक्ष वेधून घेतलेल्या इशान किशनचा भारतीय संघात समावेश केला आहे. अजित आगरकरांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने १५ खेळाडूंच्या संघाची घोषणा आज केली. (Ishan Kishan in, Shubman Gill out)
सात फेब्रुवारी ते आठ मार्च दरम्यान स्पर्धा होणार आहे. अ गटात भारतीय संघात नामिबिया, नेदरलँड, पाकिस्तान आणि अमेरिका हे संघ आहेत. भारताचा सात फेब्रुवारी रोजी मुंबईत अमेरिकेविरुद्ध पहिला सामना होणार आहे तर १५ फेब्रुवारी रोजी भारत पारंपरिक विरोधक पाकिस्तानशी भिडेल.
कर्णधार सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ खेळणार असून संजू सॅमसन विकेटकीपर संघात असणार आहे. बुमराह, हर्षित राणा, अर्शदीप सिंग जलदगती गोलंदाजीची धुरा वाहणार आहेत. (Ishan Kishan in, Shubman Gill out)
भारतीय संघ असा
सूर्यकुमार यादव (क), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, रिंकू सिंग, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, वॉशिंग्टन सुंदर, इशान किशन. (Ishan Kishan in, Shubman Gill out)