Home » Blog » महानगरपालिका निवडणुकांची आज घोषणा

महानगरपालिका निवडणुकांची आज घोषणा

by प्रतिनिधी
0 comments
The municipal corporation elections were announced today

मुंबई : प्रतिनिधी : राज्यातील महागरपालिका निवडणुकींची घोषणा आज दुपारी चार वाजता होणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे, सोमवारी दुपारी चार वाजता पत्रकार परिषद घेऊन निवडणूकीची घोषणा करणार असल्याचे पत्रक निवडणूक आयोगाने काढले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारीपूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर राज्यातील २९ महानगरपालिकाची निवडणुका होणार आहेत. आज सोमवारी दुपारी चार वाजता सह्याद्री अतिथीगृहात निवडणूक आयुक्त वाघमारे पत्रकार परिषद घेणार आहेत. १५ ते २० जानेवारीदरम्यान निवडणुका होण्याची शक्यता आहे. निवडणूक कार्यक्रमांची घोषणा निवडणूक आयुक्त करणार आहेत. निवडणूक फॉर्म भरण्याची प्रकिया या वर्षाच्या अखेरिस होणार की नवीन वर्षात होणार याची स्पष्टता दुपारी चार वाजता कळणार आहेत. (The municipal corporation elections were announced today)

मुंबई, पुणे, ठाणे, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, सांगली, नाशिक, कडोंमपा, अमरावती, नांदेड, संभाजीनगरसह २९ महानगरपालिकेच्या निवडणूका होणार आहेत. २९ पैकी फक्त नागपूर आणि चंद्रपूर महानगरपालिकेत आरक्षणाची मर्यादा ५० टक्के ओलांडली आहे. या दोन महानगरपालिका वगळता २७ महानगरपालिकेच्या निवडणूका होणार हे स्पष्ट होणार आहे. (The municipal corporation elections were announced today)

निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधारी नेत्यांनी विकासकामांचे नारळ फोडण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोमवारी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून दुपारी चारपूर्वी विविध विकास कामांचा शुभारंभ करणार आहेत. राज्यातील मंत्र्यांनी आपल्या जिल्ह्यात विकास कामांचा शुभारंभ आणि उद्घाटनाचा कार्यक्रम ठेवले आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केली असून प्रत्यक्ष निवडणुकांची घोषणा झाल्यावर निवडणुकीला खऱ्या अर्थाने रंग भरण्यास सुरुवात होणार आहे.  (The municipal corporation elections were announced today)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00