Home » Blog » आईच्या जातीच्या आधारे एससी जात प्रमाणपत्र

आईच्या जातीच्या आधारे एससी जात प्रमाणपत्र

by प्रतिनिधी
0 comments
SC caste certificate based on mother's caste

नवी दिल्ली : पाँडेचरी राज्यातील एका मुलीला तिच्या आईच्या जातीच्या आधारे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. हा निर्णय ऐतिहासिक मानला जात आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.

पाँडेचेरीतील एका मुलीला तिच्या आईच्या आदि द्रविड जातीच्या आधारे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र देण्यास परवानगी दिली आहे. एसी प्रमाणपत्र देताना वडिलांची जात आणि त्यांचा पत्ता हा प्राथमिक आधार मानला जातो. (SC caste certificate based on mother’s caste)

वडिलांची जात हीच मुलांची जात मानण्याचा परंपरागत नियमाला आव्हान देणाऱ्या अनेक याचिका सुप्रिम कोर्टात दाखल आहेत. त्यावर अद्याप अंतिम निकाल देण्यात आलेला नाही. अशा स्थितीत आईच्या जातीच्या आधारे जात प्रमाणपत्र देण्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे. (SC caste certificate based on mother’s caste)

मद्रास हायकोर्टाच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. शैक्षणिक कामासाठी आवश्यकता लक्षात घेऊन हा निकाल दिला आहे. आईच्या जातीच्या आधारे मुलीला एससी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयाला याचिकत्याने विरोध केला होता. आम्ही कायद्याच्या प्रश्नाला सध्या बगल दिली आहे, पण मुलीच्या शिक्षणाचे नुकसान होऊ नये, असे न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे. (SC caste certificate based on mother’s caste)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00