Home » Blog » Sangli student commits suicide in Delhi : सांगलीतील विद्यार्थ्याची दिल्ली मेट्रोखाली उडी मारुन आत्महत्या

Sangli student commits suicide in Delhi : सांगलीतील विद्यार्थ्याची दिल्ली मेट्रोखाली उडी मारुन आत्महत्या

by प्रतिनिधी
0 comments
Sangli student commits suicide in Delhi

नवी दिल्ली : सांगलीतील विद्यार्थ्यांने शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून दिल्लीत मेट्रोखाली उडी मारुन आत्महत्या केली. शौर्य प्रदीप पाटील (वय १६) असे त्याचे नाव आहे. तो दिल्लीतील सेंट कोलंबस शाळेत दहावी इयत्तेत शिकत होता. त्याच्याजवळ सापडलेल्या सुसाईड नोटवरुन शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती पुढे आली आहे. शिक्षकांवर गुन्हा दाखल झाला आहे. (Sangli student commits suicide in Delhi)

शौय पाटील हा मुळचा सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील ढवळेश्वर गावातील रहिवासी आहे. त्याचे वडील प्रदीप पाटील हे सोने चांदी गलाई व्यवसायानिमित्त गेले अनेक वर्षे दिल्लीमध्ये स्थायिक आहेत. शौय पाटील हा कुटुंबासमवेत दिल्लीतील राजीव नगर परिसरात वास्तव्यास हाता. तो दिल्लीतील सेंट कोलंबस शाळेत दहावीत शिकत होता. मंगळवारी १८ नोव्हेंबर रोजी त्याने राजेंद्रनगर मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वरुन खाली उडी मारुन आत्महत्या केली. या घटनेची माहिती कळताच पोलिस घटनास्थळी आले. त्यांनी त्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. शौयचे वडील कामानिमित्त मुळ गावी ढवळेश्वरला आले होते. अपघाताची माहिती मिळताच ते तातडीने दिल्लीत पोहोचले. मुलाच्या मृत्यूचा त्यांना मोठा धक्का बसला. या प्रकरणी दिल्लीतील राजा गार्डन मेट्रो पोलिसांनी शाळेच्या मुख्याध्यापिका अपराजित पॉल, मनू कालरा, युक्ती महाजन आणि ज्युली व्हर्गिस या शिक्षिकेवर गुन्हा दाखल केला आहे. (Sangli student commits suicide in Delhi)

पोलिसांना शौर्यच्या शाळेतील बॅगेत एक हिंदीत लिहिलेली सुसाईड नोट सापडली. यामध्ये त्याने लिहिले होते की, ” माझे नाव शौर्य पाटील आहे. कृपया … या मोबाईल नंबरवर फोन करा. मला माफ करा, मी असे करत आहे. पण, शाळेतील शिक्षक मला असे काही बोलले आहेत की मला हे करावे लागत आहे. जर कोणाला माझ्या अवयवांची गरज असेल तर कृपया ते दान करा. माझ्या पालकांनी माझ्यासाठी बरेच काही केले आहे. मला माफ करा, मी त्यांना काहीच देऊ शकलो नाही. सॉरी दादा, सॉरी मम्मी. आता हे शेवटच्या वेळेस मी तुमचे हृदय तोडत आहे. शाळेतील शिक्षकच असे आहेत कि काय बोलू…” असा उल्लेख सुसाईड नोटमध्ये आहे. (Sangli student commits suicide in Delhi)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00