Home » Blog » MLA Parab’s allegations : आईच्या नावाने डान्सबार चालवणाऱ्या गृहराज्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा

MLA Parab’s allegations : आईच्या नावाने डान्सबार चालवणाऱ्या गृहराज्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा

by प्रतिनिधी
0 comments
MLA Parab's allegations

मुंबई : प्रतिनिधी : आईच्या नावाने डान्सबार चालवणाऱ्या गृहराज्यमंत्र्यांनी नैतिकच्या मुद्द्यावर राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी स्वत:ची प्रतिमा स्वच्छ ठेवण्यासाठी अशा मंत्र्यांना हाकलून दिले पाहिजे, त्यांना मंत्रीमंडळातून काढून टाकावे, अशी मागणीही परब यांनी केली. (MLA Parab’s allegations)

कदम यांना न्यायालयात खेचणार

शिवसेना शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात माजी मंत्री रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. बाळासाहेबांचा मृतदेह दोन दिवस घरी ठेवला होता, असा आरोप कदम यांनी केला होता. त्यांच्या आरोपांने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांकडून रामदास कदम यांच्यावर टीका केली जात आहे. आज शनिवारी आमदार अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन रामदास कदम यांच्यावर कठोर टीका केली. कदम यांना न्यायालयात खेचणार असून त्यांच्यावर अब्रु नुकसानीचा दावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. रामदास कदमा यांना पैसे खाण्याची सवय लागली आहे, असा आरोपही केला. (MLA Parab’s allegations)

योगेश कदम यांची नार्को टेस्ट करावी

बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूपत्रावर शंका उपस्थित करणाऱ्यांनी  कोर्टात जावे असे  आव्हान परब यांनी दिले आहे. ते म्हणाले, मृत्यूपत्राबद्दल कोणाला शंका असेल तर त्यांना कोर्टात न्याय मिळू शकतो. १९९३ मध्ये विद्यमान गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईने जाळून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला याची चौकशी करावी. आजही खेडमध्ये या घटनेचे साक्षीदार असून वेळ पडली तर आम्ही साक्षीदार पुढे आणू शकतो असा इशाराही दिला. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची नार्को टेस्ट करावी. त्यामध्ये त्यांच्या आईला जाळलं की त्यांनी स्वत: जाळून घेतले हे स्पष्ट होईल. मागील अधिवेशनात फक्त दोनच प्रकरणे बाहेर आली. पुढील अधिवेशनात पुराव्यासकट आणखी प्रकरणारे बाहेर काढणार असल्याचे त्यांनी सांगितले.  (MLA Parab’s allegations)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00