Home » Blog » प्रकाश आबिटकर भावी मंत्री…: मंत्री चंद्रकांत पाटील

प्रकाश आबिटकर भावी मंत्री…: मंत्री चंद्रकांत पाटील

Vidhansabha Election : प्रकाश आबिटकर भावी मंत्री...: मंत्री चंद्रकांत पाटील

by प्रतिनिधी
0 comments

कोल्हापूर; प्रतिनिधी : काही कारणाने राधानगरीला मंत्रिपद द्यायचे राहिले होते. तेही येत्या काळात मिळून जाईल, असे सूचक वक्तव्य करीत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आमदार प्रकाश आबिटकर यांचा ‘भावी मंत्री’ असा उल्लेख केला. पाटील यांच्या या वक्तव्याची चर्चा कार्यक्रमस्थळी सुरू होती. (Vidhansabha Election )

मंत्री चंद्रकांत पाटील यांचे मूळ गाव खानापूर, ता. भुदरगड येथे उभारण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या नूतन इमारतीचे लोकार्पण मंत्री पाटील यांच्याहस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ‘मुख्यमंत्री माझी सुंदर शाळे’चे बक्षीस वितरणही त्यांच्या हस्ते झाले.

मंत्री पाटील आपल्या भाषणात समोर बसलेल्या नागरिकांना उद्देशून, आमदार आबिटकर यांच्या तिकिटाबद्दल कोणाला शंका आहे का असा प्रश्न केला. तुम्हाला शंका असण्याची शक्यता नाही, असे सांगत मी तर निर्णयप्रक्रियेत आहे. मी नेहमी तरुणांना संधी देतो, असे सांगितले.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00