Home » Blog » Rohit Pawar slams Shirsat: शिरसाटांना मलिदा पचणार नाही : रोहित पवार

Rohit Pawar slams Shirsat: शिरसाटांना मलिदा पचणार नाही : रोहित पवार

by प्रतिनिधी
0 comments
Rohit Pawar slams Shirsat

मुंबई : नवीन मुंबईतील सिडकोच्या सुमारे ५ हजार कोटी रुपयांचा भूखंड बिवलकर कुटुंबाला बेकायदा पद्धतीने दिल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादीचे नेते, आ. रोहित पवार यांनी मंगळवारी (१६ सप्टेंबर) लोकायुक्तांकडे केली. (Rohit Pawar slams Shirsat)

यासंदर्भात बोलताना आ. पवार यांनी शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला. त्यांनी जो मलिदा खाल्लेला आहे तो त्यांना पचणार नाही. त्यांचे पोट नक्कीच दुखणार आहे. आमच्या आरोपांवर त्यांना काय बोलायचे असेल तर त्यांनी पुराव्यांनिशी बोलावे, असे आव्हानही पवार यांनी दिले. (Rohit Pawar slams Shirsat)

पवार यांनी यासंदर्भात त्यांच्या एक्स अकाउंटवर पोस्टही केली आहे. सिडको भूखंड बेकायदा हस्तांतरणप्रकरणाची

राज्य सरकार गांभीर्याने दखल घेत नसल्याने राज्याच्या लोकायुक्त आणि उप लोकायुक्त कार्यालयातील प्रबंधकांची भेट घेऊन चर्चा केली. प्रक्रिया समजून घेऊन तक्रारीची कागदपत्रं त्यांच्याकडं सुपूर्द केली. या कार्यालयाच्या प्रक्रियेनुसार त्यांना लागणाऱ्या अधिकच्या कागदपत्रांची पूर्तताही त्यांना अपेक्षित फॉरमॅटमध्ये लवकरच केली जाईल. पण कोणत्याही परिस्थितीत सिडको आणि सरकारचा इतर हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार पचवू देणार नाही. (Rohit Pawar slams Shirsat)

भूमिपुत्रांसाठी लढू आणि जिंकू!
अपेक्षा आहे की, भ्रष्टाचाऱ्यांच्या नाड्या आवळण्यापासून दूर पळणारं सरकार आतातरी भानावर येईल. मुख्यमंत्र्यांनी मागितल्याप्रमाणे या प्रकरणाचे संपूर्ण पुरावे उघड केले आहेत. तसेच सोशल मिडीयाच्या माध्यमातून त्यांच्या कार्यालयापर्यंतही पोहोचवले आहेत, परंतु या पुराव्यांचं त्यांनी काय केलं हे पहावं लागेल. एक मात्र खरंय की, उद्या मोदी यांचा वाढदिवस आहे. ‘ना खाऊंगा ना खाने दूंगा’ या त्यांच्या वाक्याचा विसर मुख्यमंत्र्यांना नक्कीच पडणार नाही, अशी आमची अपेक्षा आहे, असा टोलाही पवार यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00