Home » Blog » Pawar uncle and nephews  : रोहित पवारांनी काढली भावकी, अजित पवारांनी दिली धमकी

Pawar uncle and nephews  : रोहित पवारांनी काढली भावकी, अजित पवारांनी दिली धमकी

by प्रतिनिधी
0 comments
Pawar uncle and nephews

इस्लामपूर : प्रतिनिधी : सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या प्रा. डॉ. एन.डी. पाटील विधी महाविद्यालय, श्रीमती सरोज नारायण पाटील मानसशास्त्र संशोधन केंद्र आणि प्रा. डॉ. एन. डी. पाटील बहुउद्देशीय सभागृहाचा उद्घाटन सोहळ्यात आमदार रोहित पवारांनी भावकी काढली. त्यानंतर अजित पवारांनी भावकीमुळेच तू आमदार झाला असे खडसावले. माझ्या कोणी नादी लागू नका. तुम्ही तुमचं काम करा, मी तुम्हाला एक अक्षर बोलणार नाही, अशी धमकीवजा इशाराही अजित पवारांनी दिला. (Pawar uncle and nephews)

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार जयंत पाटील, आमदार रोहित पवार हे आज एकाच मंचावर आले होते.  यावेळी भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह विविध पक्षांचे नेते एकाच मंचावर उपस्थित होते. यावेळी अजित पवार आणि रोहित पवार यांच्यात जोरदार जुगलबंदी रंगली. (Pawar uncle and nephews)

रोहित पवार भाषणात म्हणाले, आम्ही पक्षात एकत्र असताना विधानसभेत मी कसा बोलतो यावर अजित पवार यांचे लक्ष राहायचे. सभागृहात पहिले भाषण झाले तेव्हा त्यांनी मला घरी बोलावून घेतले आणि भाषणाचे कौतूक केले. त्यासोबतच सांगितले की, सभागृहात बोलत असताना शर्टचे बटन वरपर्यंत लावले पाहिजे, असे बारकाईन त्यांचे माझ्याकडे लक्ष होते. आता अजितदादा गावकीचा विचार करतात, मात्र भावकीला विसरले. अजितदादा अर्थमंत्री आहेत, निधी बाबत त्यांनी जरा विचार करावा, अशी विनंती त्यांनी पुढे केली. (Pawar uncle and nephews)

त्यानंतर भाषण करत असताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी रोहित पवारांच्या भावकीचा संदर्भ देत जोरदार पलटवार केला. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, २००४ ला मला वरिष्ठ विचारपूस करायला लागले. पण काहीकाही जणं पहिल्या टर्मलाच बोलायला लागले. त्यांना वाटतं की मी मोठ्ठा झालो पाहिजे. मी भाषण केलं पाहिजे. आता मी माझ्या पक्षाचं काम करत आहे, जयंतराव त्यांच्या पक्षाचं काम करत आहेत. पण माझ्या पक्षात मी काय करावं हे दुसरेच सल्ले द्यायला लागले. काय करायचं आणि काय नाही करायचं हे तुम्ही तुमच्या पक्षाचं बघं आम्ही आमच्या पक्षाचं बघू, असं म्हणत रोहित पवारांना टोला लगावला. (Pawar uncle and nephews)

रोहित पवारांच्या भावकीच्या टीकेवर अजित पवार म्हणाले की, मगाशी बोलताना काही जणांनी म्हटलं की दादा गावकीकडे लक्षं देताना जरा भावकीकडेही लक्ष द्या. भावकीकडे लक्षं दिलं म्हणूनच तू आमदार झालास, असा हसत हसत टोला लगावला. शरद पवार गटाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना उद्देशून अजित पवार म्हणाले की, जयंतराव त्याला विचारा किती मतं पडली. पोस्टल बॅलेटमध्ये आपला विजय झाला आहे. त्यामुळं माझ्या कोणी नादी लागू नका. तुम्ही तुमचं काम करा, मी तुम्हाला एक अक्षर बोलणार नाही, असा दम वजा इशाराच अजित पवारांनी रोहित पवारांना दिला. (Pawar uncle and nephews)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00