Home » Blog » RAHUL WISHES TO NATION : बंधुतेवर आधारित भारताचे स्वप्न पूर्ण करूया : राहुल गांधी

RAHUL WISHES TO NATION : बंधुतेवर आधारित भारताचे स्वप्न पूर्ण करूया : राहुल गांधी

by प्रतिनिधी
0 comments
RAHUL WISHES TO NATION

नवी दिल्ली : ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त, काँग्रेसचे नेते राहुल गांधी, पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि खासदार प्रियांका गांधी वड्रा यांच्यासह अनेक काँग्रेस नेत्यांनी शुक्रवारी सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले प्राणार्पण करणाऱ्या असंख्य स्वातंत्र्यसैनिकांना श्रद्धांजली वाहिली. (RAHUL WISHES TO NATION)

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर राहुल गांधी यांनी म्हटले, “महान स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाने मिळवलेले हे स्वातंत्र्य, न्याय, सत्य आणि समानतेवर आधारित असेल आणि प्रत्येक हृदयात आदर आणि बंधुता असेल, अशा भारताची निर्मिती करण्याची ही प्रतिज्ञा आहे. या मौल्यवान वारशाचा अभिमान आणि सन्मान जपणे हे आपले कर्तव्य आहे. जय हिंद, जय भारत.”

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले आहे की, “राष्ट्रीय चळवळीत अमूल्य योगदान देणाऱ्या असंख्य महान स्वातंत्र्यसैनिकांना आम्ही विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो.’’ (RAHUL WISHES TO NATION)

 “आजचा दिवस हा एक महत्त्वाचा दिवस आहे कारण आपण, भारतातील लोक, आता आपल्या हक्कांसाठी, संवैधानिक संस्थांच्या संरक्षणासाठी, सामाजिक न्यायासाठी, आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि बंधुत्वासाठी लढत आहोत. आपण एकत्र येऊन हा संघर्ष पुढे नेऊया आणि प्रत्येक भारतीयाच्या हिताचे रक्षण करण्याची प्रतिज्ञा करूया. जय हिंद,” असेही त्यांनी म्हटले आहे. (RAHUL WISHESH TO NATION)

काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वड्रा यांनीही त्यांच्या सोशल मीडियावर आपला संदेश शेअर केला. “सर्व देशवासीयांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या लाखो वीरांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी असंख्य बलिदान दिले. त्यांनी आपल्याला लोकशाही, न्याय, समानता आणि परस्पर एकतेचा राष्ट्रीय संकल्प दिला. ‘एक व्यक्ती, एक मत’ या तत्त्वाद्वारे त्यांनी आपल्याला समृद्ध लोकशाही दिली. आपले स्वातंत्र्य, संविधान आणि त्याच्या तत्त्वांचे रक्षण करण्याचा आपला संकल्प दृढ आहे. जय हिंद! जय भारत,” असे त्यांनी म्हटले आहे.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00