Home » Blog » Medha Patkar Case: मानहानीच्या खटल्यात मेधा पाटकर दोषी

Medha Patkar Case: मानहानीच्या खटल्यात मेधा पाटकर दोषी

by प्रतिनिधी
0 comments
Medha Patkar Case

नवी दिल्ली : दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही.के. सक्सेना यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी (११ ऑगस्ट) दोषी ठरवले. तथापि, या प्रकरणात मेधा पाटकर यांना लावण्यात आलेला १ लाख रुपयांचा दंड रद्द केला. (Medha Patkar Case)

पाटकर या शिक्षेच्या आदेशाचे जाणीवपूर्वक उल्लंघन करत असल्याचे निरीक्षण नोंदवत या वर्षी २३ एप्रिल रोजी दिल्लीच्या न्यायालयाने पाटकर यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. सक्सेना यांच्या २००१ च्या मानहानीच्या प्रकरणात प्रोबेशन बॉन्ड आणि १ लाख रुपये दंड ठोठावण्यात आला होता. (Medha Patkar Case)

तत्पूर्वी,  अतिरिक्त सत्र न्यायाधीश विशाल सिंह यांनी, ८ एप्रिलच्या शिक्षेचे पालन करण्यासाठी न्यायालयात हजर राहण्याऐवजी, मेधा पाटकर गैरहजर राहिल्या. तसेच नुकसानभरपाईची रक्कम सादर करण्याच्या अधीन असलेल्या प्रोबेशनचा लाभ घेण्याच्या आदेशाचे जाणीवपूर्वक पालन करण्यात अयशस्वी ठरल्या, असे निरीक्षण नोंदवले.

‘‘दोषीचा हेतू स्पष्ट आहे. त्या जाणूनबुजून न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करत आहेत; न्यायालयात हजर राहण्याचे टाळत आहेत आणि त्यांच्याविरुद्ध सुनावलेल्या शिक्षेच्या अटी स्वीकारण्यासही टाळाटाळ करत आहेत,’’ असे न्यायाधीशांनी बुधवारी म्हटले होते. (Medha Patkar Case)

८ एप्रिल रोजी, सत्र न्यायालयाने २००१ मध्ये गुजरातमधील एका स्वयंसेवी संस्थेचे प्रमुख असलेल्या सक्सेनाविरुद्धच्या मानहानीच्या खटल्यात पाटकरना “चांगल्या वर्तनासाठी प्रोबेशन” वर सोडले होते. सत्र न्यायालयाने १ जुलै २०२४ रोजी दंडाधिकारी न्यायालयाच्या आदेशात बदल करून त्यांना पाच महिन्यांची साधी कारावासाची शिक्षा सुनावली होती.

पाटकरांना १ लाख रुपये भरपाई जमा करण्यास सांगितले, ते सक्सेना यांना देण्यात येणार होते.

दोन दिवसांनंतर, २५ एप्रिल रोजी, दिल्ली पोलिसांनी पाटकरना अटक केली. तथापि, त्याच दुपारी दिल्ली उच्च न्यायालयाने पाटकरांची शिक्षा २० मे पर्यंत पुढे ढकलली.

पार्श्वभूमी

२५ नोव्हेंबर २००० रोजी पाटकर यांनी ‘देशभक्ताचा खरा चेहरा’’ या शीर्षकाखाली एक प्रेस नोट जारी केली होती. त्यामध्ये, त्यांनी सक्सेना यांचा हवाला व्यवहारात सहभाग असल्याचा आरोप केला होता. एनबीएने ४०,००० रुपयांचा चेक दिला होता जो नंतर खाते अस्तित्वात नसल्यामुळे बाउन्स झाला, याकडे लक्ष वेधत त्यांना उद्देशून ‘देशभक्त नसून कायर’ असे म्हटले होते. त्यावरून हा खटला दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा :
विरोधकांचा मोर्चा रोखला; राहुल, प्रियंका पोलिसांच्या ताब्यात
धनकड कुठे आहेत? : राऊत यांचे शहांना पत्र

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00