नवी दिल्ली : बिहारमधील सखोल मतदार पुनरावलोकन मोहीमे (एसआयआर) विरोधात निदर्शने आणि संसदेपासून निवडणूक आयोगापर्यंत मोर्चा काढणारे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार प्रियंका गांधी, संजय राऊत आणि सागरिका घोष यांच्यासह इंडिया आघाडीच्या खासदारांना पोलिसांनी सोमवारी (११ ऑगस्ट) ताब्यात घेतले. (Oppositions detained)
दरम्यान, निवडणूक आयोगाने विरोधी पक्षाच्या खासदारांना चर्चेसाठी निमंत्रण दिले आहे. (Oppositions detained)
ही लढाई संविधान वाचवण्यासाठी: राहुल गांधी
लोकसभेचे खासदार आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले, ‘‘परिस्थिती अशी आहे की सत्ताधारी बोलू शकत नाहीत. सत्य देशासमोर आहे. ही लढाई राजकीय नाही. ही लढाई संविधान वाचवण्यासाठी आहे. ही लढाई एक माणूस, एक मत यासाठी आहे. आम्हाला स्वच्छ, शुद्ध मतदार यादी हवी आहे.’’
काँग्रेसचे मीडिया प्रभारी जयराम रमेश यांनी ही माहिती दिली. भारतीय निवडणूक आयोगाने सोमवारी (११ ऑगस्ट) दुपारी १२ वाजताची वेळ दिली आहे, असे त्यांनी सांगितले. त्यानुसार शिष्टमंडळ चर्चेसाठी जाणार असल्याचे ते म्हणाले. (Oppositions detained)
काँग्रेस नेते आणि खासदार जयराम रमेश यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. जयराम रमेश यांनी काही राजकीय पक्षांच्या वतीने केलेल्या विनंतीला उत्तर म्हणून ही वेळ देण्यात आली आहे. जागेच्या मर्यादेमुळे, निवडणूक आयोगाने बैठकीसाठी जास्तीत जास्त ३० लोकांची नावे आणि त्यांच्या वाहन क्रमांक सादर करण्याची विनंती केली आहे. (Oppositions detained)
दरम्यान, विरोधकांनी सकाळी कामकाज सुरू होताच ते घोषणाबाजी करत बंद पाडले. प्रश्नोत्तराचा तास सुरू होताच लोकसभेच्या वेलमध्ये विरोधी सदस्यांनी फलक फडकावून आणि ‘आम्हाला न्याय हवा आहे’ अशा घोषणा देत गोंधळ घातला. त्यामुळे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहाचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब केले.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले की, गेल्या १४ दिवसांपासून विरोधी पक्ष नियोजनबद्ध पद्धतीने सभागृहात व्यत्यय आणत आहेत. हे लोकशाही प्रक्रियेला मारक आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. देश सभागृहातील या घटनांकडे पाहत आहे. त्यामुळे सदस्यांनी सभागृहाचे कामकाज चालू द्यावे, आवश्यक त्या महत्त्वाच्या चर्चेसाठी वेळ देण्यात येईल, असेही बिर्ला यांनी सांगितले. तथापि, सदस्य ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे कामकाज स्थगित करण्यात आले.