Home » Blog » Amit Shaha : पहलगाम हल्ल्यातील तीन दहशतवादी ठार, अमित शहांची लोकसभेत माहिती

Amit Shaha : पहलगाम हल्ल्यातील तीन दहशतवादी ठार, अमित शहांची लोकसभेत माहिती

by प्रतिनिधी
0 comments
Amit Shaha

नवी दिल्ली : प्रतिनिधी : पहलगाम हल्ल्यातील तीन दहशतवाद्यांना ठार मारले, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत दिली. “मी सदनाला आणि देशातील लोकांना सांगू इच्छितो की बैसरण खोऱ्यात ज्यांनी आपल्या लोकांना मारले.. तिन्ही दहशतवादी मारले गेले आहेत”, असे सभागृहाला सांगितले. त्यांनी ऑपरेशन महादेव बाबत निवेदन केले. अमित शहा यांनी माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांच्यावर टीका करताना ते पाकिस्तानला क्लिन चिट का देत आहेत, असा सवाल उपस्थित करत काँग्रेसवर टीका केली. (Amit Shaha)

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात भारत पाक संघर्ष, ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेच्या दुसऱ्या दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत ऑपरेशन महादेव बाबत माहिती दिली. पहलगाममधील सर्व तीन हल्लेखोर ठार केल्याची पुष्ठी त्यांनी केली. सुलेमान, जिब्रान आणि अफगाणी हे सर्व पाकिस्तानी असून त्यांचे लष्कर-ए-तैयबाशी संबध होते असे ते म्हणाले. भारतीय लष्कर, सीआरपीएफ आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी केलेल्या संयुक्त ऑपरेशन महादेवमध्ये पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या तीन दहशतवाद्यांना निष्क्रिय केले आहे असे शहा यांनी सांगितले. (Amit Shaha)

पहलगाम हल्ल्यानंतर आपण ताबडतोब काश्मीरला पोहोचलो आणि तिथे आढावा बैठक घेतली. बैठकीत हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना सीमा ओलांडून देश जाऊ नये असे आदेश दिले होते, अशी माहितीही त्यांनी सभागृहात दिली. (Amit Shaha)

अतिरेक्यांना ठार मारल्यानंतर त्यांची ओळख पटवण्यात आली असेही त्यांनी सांगितले. दहशतवाद्यांना मारल्याचे ऐकून विरोधकांना आनंद झाला नाही, असा आरोपही अमित शहा यांनी केला. मारलेल्या दहशतवाद्यांचा धर्म पाहून नाराज होऊ नका असे ते म्हणाल्यावर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला. (Amit Shaha)

अमित शहा म्हणाले, पहलगाम हल्ल्याच्या तपासादरम्यान १०५५ लोकांची तीन हजार तास चौकशी करण्यात आली आणि तपास पथकाने हल्ल्यानंतर तीन दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्यांची ओळख पटवली.

पहलगाम हल्ल्यानंतर मी लगेच पीडित कुटुबांना भेटलो. लग्नाच्या फक्त सहा दिवसांनी विधवा झालेली एक महिला माझ्यासमोर उभी राहिलेली मी पाहिली. ते दृश्य मी कधीही विसरु शकत नाही. आज मी सर्व कुटुंबाना सांगू इच्छितो की मोदीजींनी दहशतवादी पाठवणाऱ्यांना निष्क्रीय केले. आणि आज आपल्या सुरक्षा दलांनी हत्याकांड करणाऱ्यांना ठार मारले. (Amit Shaha)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00