पुणे : प्रतिनिधी : राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी आज शनिवारी भल्या पहाटे हिंजवडीतील विकास कामे आणि अनाधिकृत कामांची पाहणी दौरा केला. ओढ्यावर भाजी मंडई बांधणाऱ्या विकासकाला झापताना तुमच्यामुळे हिंजवडीत बसेस बुडायला लागल्यात असे सांगून कामात आडवे येणाऱ्यांवर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. हिंजवडीच्या सरपंचांना तर चांगलेच झापले. आपलं वाटोळं झालं, आयटी पार्क बेंगलोर अन् हैद्राबादला चालले अशा शब्दात नाराजी व्यक्त करत यापुढे चुकीच्या गोष्टी स्वीकारणार नाही असा दमच दिला. (Ajit Pawar reprimanded)
उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी सकाळी ओढ्यावरील अनधिकृत भाजी मंडई पाडकामाची पाहणी केली. हिंजवडी जवळील माण ग्रामपंचायत जवळ ओढ्यावर ग्रामपंचायतीकडून भाजी मंडई उभारण्याचे काम हाती घेतले होते. उपमुख्यमंत्री पवार यांनी या नाल्यावरील हे बांधकाम जमीनदोस्त करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर प्रशासनाकडून भाजी मंडई पाडण्याचे काम सुरू झाले आहे. त्याच नाल्यावर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहणी केली. (Ajit Pawar reprimanded)
हिंजवडीतील नाल्यांवरती बांधकाम केल्यामुळेच मोठ्या प्रमाणावरती पाणी साचत असल्यामुळे थेट विकासकालाच तुमच्यामुळे बस पाण्यात गेली. तुम्ही पैसा कमवणार आणि बदनामी आमच्या राज्याची, असं थेट अजित पवारांनी या विकासाला सुनावलं आहे. हिंजवडीसह परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून कठोर पावले उचलली जात आहे. दरम्यान अद्यापही या कामांच्या मध्ये काही जण येत असल्याचे अधिकाऱ्यांनी यावेळी अजित पवारांना सांगितले. अजित पवार यांनी कामांच्यामध्ये आडवे येणाऱ्या सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हे दाखवले करण्यात आले. (Ajit Pawar reprimanded)
अजित पवारांनी हिंजवडीचे सरपंच गणेश जांभुळकर यांना देखील सुनावल्याचं दिसून आलं. सरपंच अजित पवारांशी बोलत असताना ते म्हणाले, असू द्या हो साहेब, धरणे बांधताना मंदिर जातातच की नाही. तुम्हाला सांगायचं ते सांगा मी ऐकून घेतो, पण मी काय करायचं तेच करतो…आपलं वाटोळं झालंय, हिंजवडीचं सगळं आयटी पार्क बाहेर चाललाय…माझ्या पुण्यातून महाराष्ट्रातून बाहेर….बेंगलोरला हैदराबादला …काय तुम्हाला पडलं नाही….कशाला मी सहा वाजता पाहणी करायला येतो इथं, मला कळत नाही माझी माणसं नाहीत…हे केल्याशिवाय गत्यंतर नाही… असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिंजवडीचे सरपंच गणेश जांभुळकर खडेबोल सुनावले आहेत. (Ajit Pawar reprimanded)