मुंबई : प्रतिनिधी : मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात राष्ट्रवादीच्या आमदार रोहित पवारांनी पोलिस अधिकाऱ्यांवर दादागिरी केल्याचा व्हिडिओ बाहेर पडल्यानंतर त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. आमदार पवार यांनी थेट पोलिस अधिकाऱ्यालाच आवाज खाली… असा दम दिला. (Rohit Pawar)
विधानभवनाच्या आवारात आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकात राडा झाला. पोलिसांनी आव्हाड आणि पडळकर यांच्या समर्थकांकडे चौकशी करत आव्हाडांचे समर्थक नितीन देशमुख यांना ताब्यात घेतले. त्यानंतर जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार यांनी मरीन ड्राईव्ह पोलीस स्थानकात ठिय्या मारला. दरम्यान, आमदार रोहित पवार यांचा पोलिस ठाण्यात अधिकाऱ्यांना दमबाजी करत असलेला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Rohit Pawar)
”आवाज खाली…बोलता येत असेल तर बोलायचे..बाहेर जा तुम्ही”, असे रोहित पवार पोलिसांना रागाने म्हणत असल्याचे व्हिडिओत दिसते. यावेळी पोलिस स्थानकात कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली होती.
आमदार रोहित पवार म्हणाले, गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांना बाहेर थांबवले गेले. मात्र तरीही ते आत आले. आव्हाड यांना आलेली धमकी अध्यक्षांना सांगूनसुद्धा असे प्रकार घडत आहेत. गांजा विकणारा माणूस घेऊन भाजपचे आमदार विधानभवनमध्ये येतात. सांगलीमध्ये एक आका तयार झाला आहे. ‘न्यू आका इन मेकिंग’ला सरकारने कंट्रोल करावे”, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मोठ्या मनांचे असते तर पवार साहेबांवर टीका करणाऱ्यांना जाब विचारला असता. मात्र तसे नाही. नितीन देशमुख यांना रात्री भेटलो. त्यांना जे जे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. आज त्यांना जामीन मिळेल, असेही पवार म्हणाले. (Rohit Pawar)
गोपीचंद पडळकर यांच्याविषयी बोलताना ते म्हणाले, हे मास्टरमाईंड आहेत. नवीन आका समोर आलाय. अधिवेशनात गुंड आणले गेले आहे, हे अतिशय घातक आहे.