Home » Blog » CM expressed his anger : मुख्यमंत्री म्हणाले, …सगळे आमदार माजलेत

CM expressed his anger : मुख्यमंत्री म्हणाले, …सगळे आमदार माजलेत

by प्रतिनिधी
0 comments
CM expressed his anger

मुंबई : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांत फ्री स्टाइल हाणामारीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांनी शुक्रवारी (१८ जुलै)  महत्त्वाचे विधान केले आहे. गुरुवारी पडळकर-आव्हाड समर्थकांत झालेल्या मारहाणीनंतर राज्यातील जनतेच्या काय भावना आहेत, हेच मुख्यमंत्र्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. (CM expressed his anger)

ते म्हणाले, ‘‘लोक म्हणतायत, सगळे आमदार माजलेत!’’ काल येथे जे काही झाले त्यामुळे केवळ एका माणसाची प्रतिष्ठा गेलेली नाही. संपूर्ण सभागृहाच्या प्रतिष्ठेला गालबोट लागले आहे. हे काही बरे नाही. आज बाहेर एकट्या पडळकरला शिव्या पडत नाहीत. लोक आपल्या सर्वांनाच शिव्या देत आहेत. लोक म्हणतायत की सगळे आमदार माजलेत,” अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी सभागृहात संताप व्यक्त केला. (CM expressed his anger)

गुरुवारी विधानसभेत झालेल्या राड्याप्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी आमदार गोपीचंद पडळकर आणि आ. जितेंद्र आव्हाड यांना सभागृहात खेद व्यक्त करण्यास सांगितले. मात्र, आव्हाड यांनी यावेळी त्यांना आलेल्या धमकीचा उल्लेख केला. त्यावर सत्ताधारी आमदारांनी आव्हाडांना रोखलं आणि मूळ विषयावर बोलण्यास सांगितले. त्यानंतर विरोधी बाकांवरील सदस्यांनी, आव्हाडांना बोलू द्या, त्यांना रोखू नका यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. (CM expressed his anger)

सीसीटीव्ही फुटेज पाहून कारवाई : नार्वेकर

दरम्यान, विधिमंडळ परिसरातील हाणामारीच्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचा अहवाल आल्यावर हाणामारी करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा :
भविष्यात विधानभवनात आमदारांचे खून पडतील :  राज ठाकरे
आमदार रोहित पवारांनी भरला पोलिस अधिकाऱ्याला दम

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00