Home » Blog » Porsche Car Accident: पोर्श कार अपघात प्रकरणात पुणे पोलिसांना धक्का

Porsche Car Accident: पोर्श कार अपघात प्रकरणात पुणे पोलिसांना धक्का

by प्रतिनिधी
0 comments
Porsche Car Accident

पुणे : बेदरकारपणे पोर्श कार चालवून दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या १७ वर्षीय मुलावर प्रौढ म्हणून खटला चालवण्याची मागणी करणारा पुणे पोलिसांचा अर्ज पुण्यातील बाल न्याय मंडळाने (जेजेबी) मंगळवारी फेटाळून लावला. त्यामुळे पुणे पोलिसांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. (Porsche Car Accident)

१९ मे २०२४ रोजी पहाटे हा अपघात झाला होता. पुण्यातील कल्याणीनगर परिसरात ही घटना घडली होती. पोर्श चालवणाऱ्याने दुचाकीवरून जाणाऱ्या दोन आयटी अभियंत्यांना धडक दिली. या भीषण अपघातात मध्य प्रदेशातील अनीश अवधिया आणि अश्विनी कोष्टा या दोन तरुण अभियंत्यांचा जागीच मृत्यू झाला. पोर्श कार चालवणारा चालक हा अल्पवयीन होता. तो पुण्यातील एका प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा आहे. अपघातानंतर तो मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत असल्याचे समोर आले होते. (Porsche Car Accident)

बाल न्याय मंडळाने त्याला वाहतूक शिस्तीवर ३०० शब्दांचा निबंध लिहिण्यासारख्या अटींवर जामीन दिला होता. या निर्णयामुळे देशभरात मोठी खळबळ उडाली होती. या अपघातानंतर एक वर्षापेक्षा जास्त काळानंतर बाल न्याय मंडळाने दिलेल्या आदेशामुळे पुन्हा चर्चेला तोंड फुटण्याची शक्यता आहे. (Porsche Car Accident)

पुणे पोलिसांनी सखोल तपास करून आरोपीचे वय आणि त्याच्या वर्तणुकीबद्दल अनेक पुरावे सादर केले होते. तसेच त्याला प्रौढ मानून कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी केली होती. मात्र, बाल न्याय मंडळाने पुणे पोलिसांनी दाखल केलेली याचिका फेटाळून लावली आहे. दरम्यान, या निकालावर प्रतिक्रीया व्यक्त करताना तपास अधिकारी एसीपी गणेश इंगळे यांनी सांगितले की,  बाल न्याय मंडळाने पोलिसांचा अर्ज फेटाळला आहे. आम्ही निकालाची प्रत मिळण्याची वाट पाहत आहोत.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00