Home » Blog » Root’s century : रुटचे शतक, बुमराहचे पाच बळी

Root’s century : रुटचे शतक, बुमराहचे पाच बळी

by प्रतिनिधी
0 comments
Root’s century

लंडन : लॉर्डस् वर भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने पहिल्या डावात ३८७ धावा केल्या. भारतीय गोलंदाजांना सामना करताना जो रुटने (१०४) शानदार शतक झळकावले. जसप्रित बुमराहने भेदक गोलंदाजी करताना पाच गडी बाद केले. भारताने पहिल्या डावात एक बाद ३८धावा केल्या. के.एल. राहूल १० तर करुण नायर १५ धावांवर खेळत आहेत. (Root’s century)

पहिल्या दिवसातील चार बाद २५१ धावसंख्येवरुन इंग्लंडने डाव सुरू केला. काल नाबाद ९९ धावसंख्येवरुन खेळणाऱ्या ज्यो रुटने शतक झळकावले. कर्णधार बेन स्टोक्सला बुमराहने चकवत त्याचा त्रिफळा उडविला. ११० चेंडू खेळून स्टोक्सने ४४ धावा केल्या. त्यानंतर शतकवीर रुटलाही बुमराहने बाद केले. आत येणाऱ्या चेंडूने त्याच्या त्रिफळा उडाला. ख्रिस वोक्सला बुमराहने शून्यावर बाद केले. त्याचा झेल बदली खेळाडू ध्रुव जुरेलने घेतला. सलग तीन गडी बाद केल्याने भारताने सामन्यावर पकड मिळवली होती. पण जेमी स्थिथ आणि ब्रायडन कार्सने इंग्लंडची पडझड थांबली. दोघांनी जलदगती आणि फिरकी गोलंदाजी खेळून काढली. स्मिथ आक्रमक होता. उपहारापर्यंत ही जोडी टिकून होती. (Root’s century)

उपहारानंतर मोहम्मद सिराजने स्मिथ-कार्सची जोडी फोडली. सिराजच्या गोलंदाजीवर बदली खेळाडू ध्रुव जुरेलने त्याचा झेल टिपला. सहा चौकाराच्या सहाय्याने स्मिथने ५१ धावा केल्या. सिराजच्या गोलंदाजीवर ब्रायडन कार्स क्लिन बोल्ड  झाला. त्याने सहा चौकार आणि एक षटकार मारला. जोफ्रा आर्चरला (४) बोल्ड करत बुमराहने पहिल्या डावात पाच बळींची नोंद केली. शोयब बशीर १ धावावर नाबाद राहिला. इंग्लंडने पहिल्या डावात ३८७ समाधानकारक धावसंख्या उभारली.

भारताकडून यशस्वी गोलंदाज ठरला तो जसप्रित बुमराह. त्याने २७ षटकात पाच निर्धाव षटके टाकून ७४ धावात पाच गडी बाद केले. मोहम्मद सिराज आणि नितिश कुमार रेड्डीने प्रत्येकी दोन तर रवींद्र जडेजाने एक बळी मिळवला.

भारताकडून पहिल्या डावाची सुरुवात करण्यासाठी यशस्वी जैस्वाल आणि के.एल. राहूल मैदानात उतरले. यशस्वी जैस्वालने तीन चौकार मारत चांगली सुरूवात केली. पण कसोटी क्रिकेटमध्ये चार वर्षांनी पुनरागमन करणाऱ्या जोफ्रा आर्चरने त्याला बाद केले. आर्चरच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूला बॅटची कड लागून चेंडू स्लिपमधील हॅरी ब्रुकच्या हातात विसावला. त्याने १३ धावा केल्या. के.एल. राहूल १० तर करुण नायर १५ धावांवर खेळत आहेत. (Root’s century)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00