Home » Blog » एक फोटो बदल घडवणारा माणूस तयार करु शकतो : सुधारक ओलवे

एक फोटो बदल घडवणारा माणूस तयार करु शकतो : सुधारक ओलवे

by प्रतिनिधी
0 comments
Award presented to Anil Velhal

कोल्हापूर : प्रतिनिधी : एक फोटो परिस्थिती बदलू शकत नाही, परंतु बदल घडवणारा माणूस मात्र तयार करू शकतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ छायाचित्रकार पद्मश्री सुधारक ओलवे यांनी केले. जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त कोल्हापूर प्रेस क्लब अंतर्गत कार्यरत कोल्हापूर प्रेस फोटोग्राफर क्लब आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जैन अल्पसंख्यांक आर्थिक महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी होते.पद्मश्री सुधारक ओलवे यांच्या हस्ते  ‘जॉनी ट्रेनर जीवनगौरव पुरस्कार’ अनिल वेल्हाळ तर  ‘संजय देसाई स्मृती विशेष दृष्टी पुरस्काराने’ प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांना प्रदान करण्यात आला. (Award presented to Anil Velhal)

प्रेस फोटोग्राफरांनी आपण माणूस आहोत हे लक्षात ठेवावे

प्रेस फोटोग्राफरांनी आपणही माणूस आहोत हे लक्षात ठेवावे. त्यांनी प्रथम समोरच्याचे ऐकून घेणे शिकावे. कुठलाही फोटो एका वेळी होत नाही. जंगलात जरी गेला तरी हाच नियम आहे.  तेथेही वाट पाहावी लागते.  मग प्रेस फोटोग्राफर म्हणून आपण प्रत्येक वेळी घाई करावीच का? असा प्रश्न  सुधारक ओलवे यांनी केला.  समाजाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलण्याची सूचना त्यांनी केली. फोटो काढण्याच्या नादात असलेल्या गर्दीपासून स्वतःला वेगळं ठरवतो. तो नुसता, बॅगेत काहीतरी शोधून, लेन्स सरळ करून, फोटो काढायला सुरुवात करत नाही. तो नम्रतेने एखाद्या ठिकाणी प्रवेश करतो, जो पापाराझींच्या या युगात क्वचितच आढळते.

कॅमेऱ्याच्या लेन्समागे जाण्यापूर्वी मानवी नातेसंबंध जुळणे अत्यावश्यक

ते म्हणाले,  एखादी स्टार असो वा रस्त्यावरील सामान्य माणूस, त्याच्यासाठी, कॅमेऱ्याच्या लेन्समागे जाण्यापूर्वी मानवी नातेसंबंध जुळणे अत्यावश्यक आहे. हीच त्याची कला आहे.  यामुळेच त्याच्या छायाचित्रांमध्ये आत्म्याचे सौंदर्य उतरते.  “संजीव भोर यांच्यासारखी दृष्टी सर्वच सहकाऱ्यांना आली तर नक्कीच बदल घडेल. आम्ही जंगलात जाऊन कॅमेऱ्याने सौंदर्य टिपतो. तुमचा विभाग रस्त्यावरचे सौंदर्य आणि शिस्त टिपतो. तुमच्यासारखी सौंदर्यदृष्टी प्रादेशिक परिवहन विभागाला लाभावी” अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली. (Award presented to Anil Velhal)

जॉनी ट्रेनर व्यवसायातील गुरू: अनिल वेल्हाळ

पुरस्काराला उत्तर देताना अनिल वेल्हाळ म्हणाले, “जॉनी ट्रेनर हे माझ्या व्यवसायातील गुरु होते. हे जवळचे सहकारी झाले. त्यांच्या नावाने मिळालेला हा पुरस्कार माझ्यासाठी मोलाचा आहे. येथे उपस्थित जवळपास सर्वच प्रेस फोटोग्राफर मला गुरुस्थानी मानतात आणि त्याच्या कडुन देण्यात आलेला हा पुरस्कार म्हणजे हा माझा मोठा गौरव आहे.”असे मी मानतो.

कार्यक्रमात पद्मश्री सुधारक ओलवे यांच्या छायाचित्रांचा स्लाईड शो दाखवण्यात आला.  यावेळी चंद्रकांत खरटमल, ललित गांधी, जयेश ओसवाल,  जस्मिन अत्तार , मन्सूर अत्तार,  संध्या संजय देसाई , प्रणव देसाई उपस्थित होते. प्रास्ताविक मोहन मेस्त्री यांनी केले तर आभार अदित्य वेल्हाळ यांनी मानले. (Award presented to Anil Velhal)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!