Home » Blog » Teachers agitation : शिक्षकांवर संघर्ष करण्याची वेळ येऊ देऊ नका : शरद पवार

Teachers agitation : शिक्षकांवर संघर्ष करण्याची वेळ येऊ देऊ नका : शरद पवार

by प्रतिनिधी
0 comments
Teachers agitation

मुंबई : प्रतिनिधी : ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांवर संघर्ष करण्याची वेळ येऊ देऊ नका, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारवर केली. मुंबईत आझाद मैदानावर गेले चार दिवस विनाअनुदान शिक्षकांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला शरद पवार यांनी भेट दिली. यावेळी खासदार निलेश लंकेही उपस्थित होते. (Teachers agitation)

दरम्यान विनाअनुदान शिक्षकांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली. सायंकाळी अधिवेशन संपल्यावर शिक्षकांच्या खात्यावर त्यांचा पगार जमा होईल, असे आश्वासन मंत्री गिरीष महाजन यांनी दिले. (Teachers agitation)

आझाद मैदानातील विना अनुदान शिक्षकांच्या संपाला काल मंगळवारी खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार यांनी भेट दिली होती. आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास शरद पवार यांनी भेट दिली. यावेळी शिक्षकांसमोर बोलताना शरद पवार म्हणाले, “ज्ञानदानाची जबाबदारी ज्यांच्या आहे आणि उदयाची महाराष्ट्राची पिढी ही तयार करायची नैतिक जबाबदारी ज्यांनी अंत:करणापासून स्वीकारली आहे त्यांना संघर्ष करण्याची वेळ येऊन देऊ नका. लवकरात लवकर जी २४ ऑक्टोबरला जी ऑर्डर काढली आहे ती पोकळ ऑर्डर ठेऊ नका. त्यासाठी हजार बाराशे कोटी रुपये लागतील. मला निश्चित आकडा माहित नाही. पण त्याची तरतूद करा आणि पैसे द्यायला सुरुवात करा” (Teachers agitation)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00