Home » Blog » Belgaum Suicide case:  आर्थिक विवंचनेतून एकाच कुटुंबातील तिघांची आत्महत्या

Belgaum Suicide case:  आर्थिक विवंचनेतून एकाच कुटुंबातील तिघांची आत्महत्या

by प्रतिनिधी
0 comments
Belgaum Suicide case

बेळगाव : प्रतिनिधी: बेळगावात एकाच कुटुंबातील चौघाजणांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. त्यांपैकी तिघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे बेळगाव हादरले आहे. आर्थिक विवंचनेतून हा प्रकार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. (Belgaum Suicide case)

बेळगावातील जोशी मळा येथील कुरडेकर कुटुंबाने सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न केला. कुटुंबातील चौघांनी एकाच वेळी विष प्राशन केल्याची दुर्दैवी घटना घडली. संतोष कुरडेकर, सुवर्णा कुरडेकर, मंगला कुरडेकर, आणि सुनंदा कुराडेकर अशी त्यांची नावे आहेत. (Belgaum Suicide case)

 यापैकी संतोष, सुवर्णा आणि मंगला यांचा घरातच मृत्यू  झाला तर सुनंदा यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना  रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेत आई, मुलगा आणि मुलगी यांचा मृत्यू झाला आहे.

 शहापूर पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. कायदा सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांनी घटनास्थळी भेट दिली.

हेही वाचा :
गुजरातमध्ये पूल कोसळला; आठ जणांचा मृत्यू

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00