Home » Blog » Lalu criticizes Modi: दोन गुजराती आठ कोटी बिहारींचा हक्क हिरावून घेताहेत : लालूप्रसादांची जहरी टीका

Lalu criticizes Modi: दोन गुजराती आठ कोटी बिहारींचा हक्क हिरावून घेताहेत : लालूप्रसादांची जहरी टीका

by प्रतिनिधी
0 comments
Bihar bandh

पाटणा : राजदचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जहरी टीका केली. ‘‘दोन गुजराती बिहारमधील सुमारे ८ कोटी रहिवाशांचा मतदानाचा हक्क हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत आहेत,’’ असा आरोप लालू प्रसाद यादव यांनी केला आहे. (Lalu criticizes Modi)
एक्सवरील एका पोस्टमध्ये ते म्हणाले, ‘‘हे दोन गुजराती बिहार, संविधान आणि भारतीय लोकशाहीच्या विरोधात आहेत. त्यामुळे आता उठा, आवाज उठवा आणि संविधान आणि भारतीय लोकशाही वाचवा.’’ लालू प्रसाद यांच्या भावनिक पोस्टमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

९ जुलै रोजी इंडिया आघाडीचा ‘बिहार बंद’
दरम्यान, राज्यातील मतदार यादीत सुधारणा करण्याच्या निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयाविरोधात इंडिया आघाडीने ९ जुलै रोजी बिहार बंदची हाक दिली आहे. या बंदमध्ये काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सहभागी होण्याची शक्यता आहे. (Lalu criticizes Modi)

बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी प्रसाद यांनी, निवडणूक आयोगाचे पाटणा कार्यालय योग्यरित्या काम करत नाही. त्याची अवस्था एका पोस्ट ऑफिससारखी झाली आहे. हे कार्यालय स्वतःहून कोणताही निर्णय घेऊ शकत नाही, अशी टीका केली आहे. (Lalu criticizes Modi)

राज्यातील मतदार यादीची विशेष सखोल सुधारणा (SIR) मोहीम निवडणूक आयोगाने सुरू केली आहे. त्याला इंडिया आघाडीने तीव्र आक्षेप घेतला आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीच्या समन्वय समितीचे अध्यक्ष आणि राजद नेते तेजस्वी प्रसाद यादव हे आहेत. त्यांनी सोमवारी (७ जुलै) सांगितले की, विधानसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने विशेष सखोल सुधारणा (SIR) मोहीम हाती घेतली आहे. त्याला इंडिया आघाडीचा तीव्र  विरोध आहे. आयोगाच्या या निर्णयाविरोधात विरोधी पक्षांनी ‘बिहार बंद’ची हाक दिली आहे. (Lalu criticizes Modi)

‘‘आम्ही ९ जुलै रोजी ‘चक्का जाम’ करू. निवडणूक आयोग आणि सरकार दोघेही विरोधकांच्या निशाण्यावर असतील. निवडणूक आयोग दर तासाला आपले आदेश बदलत आहे हे आश्चर्यकारक आहे. परिणामी, पडताळणी प्रक्रियेत गुंतलेले बीएलओ आणि इतर अधिकारी गोंधळलेले आहेत,’’ असे तेजस्वी यादव माध्यमांशी बोलताना म्हणाले.

‘‘एसआयआरशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी ६ जुलै रोजी एक शिष्टमंडळ निवडणूक आयोगाला भेटले, परंतु कोणताही प्रतिसाद मिळाला नाही,’’ असे ते म्हणाले. (Bihar bandh)


हेही वाचा :
बिहारनंतर आता प.बंगाल आणि दिल्लीत मतदार तपासणी मोहीम
२६/११ च्या हल्ल्यावेळी मुंबईतच होतो : राणा; आयएसआयचा सहभाग स्पष्ट

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00