Home » Blog » Sahar Imami : बॉम्ब हल्ल्यानंतर टीव्ही अँकर हिमतीने परतली

Sahar Imami : बॉम्ब हल्ल्यानंतर टीव्ही अँकर हिमतीने परतली

by प्रतिनिधी
0 comments
Sahar Imami

तेहरान : इराणच्या सरकारी मिडिया कार्यालयावर केलेल्या हल्ल्यानंतर लाइव्ह प्रसारणादरम्यान इराणच्या महिला अँकरला स्टुडिओ सोडून पळ काढावा लागला. पण थोडावेळ्याने ती अँकर पुन्हा बातम्या देण्यासाठी परतली. सहर इमामी असे या धाडसी अँकरचे नाव आहे. सहर इमामी आता इराणच्या प्रतिकाराच्या प्रतिक बनल्या आहेत. इराणमधील लोक त्यांचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करत असून हाच देशाचा कणखर आवाज आहे, अशा भावना व्यक्त करत आहेत. (Sahar Imami)

इस्त्रायलकडून इराणावर जोरदार हल्ले सुरू आहेत. त्यामुळे इराणची सरकारी मिडिया कार्यालयावर हल्ला झाला. यावेळी लाइव्ह प्रसारण सुरू असताना हल्ला झाल्याने अँकरर सहर इमामीने बचावासाठी पळ काढून सुरक्षित जागी गेल्या. पण त्या घटनेचा व्हिडिओ शेअर करत इराणी अँकर बातम्या देताना पळून गेली अशी खिल्ली उडवली गेली. या हल्ल्यात काही लोकांचा मृत्यूही झाला. इराणी माध्यमांनी या घटनेचा व्हिडिओ शेअर करत असे म्हटले आहे की हा स्फोट टीव्हीवर लाईव्ह असताना झाला. अँकर इस्त्रायलचा निषेध करत होत्या. त्यानंतर एक स्फोट झाला. स्फोटानंतर स्टुडिओमध्ये काही पडताना दाखवण्यात आले आहे. काही क्षणातच अँकर सहर इमामी लाईव्ह प्रक्षेपण सोडताना दिसून आल्या. (Sahar Imami)

इस्त्रायलच्या सरंक्षणमंत्र्यानीही या हल्ल्याची पृष्टी केली. हल्ल्यानंतर काही तासानंतर आयआयआयबीने पुन्हा प्रक्षेपण सुरू केले. पुन्हा अँकर सहर इमामी बुलेटीन करण्यासाठी पडदयावर आल्या. हल्ल्यानंतर सहर इमामी अँकरिंग करताना म्हणाल्या, जे काही घडले ते अभिव्यक्ती स्वातंत्र दडपण्याचा इस्त्रायली राजवटीचा एक हताश प्रयत्न होता. न्यूज नेटवर्कच्या इमारतीवर हल्ला झाला. तर सत्याचा आवाज दडपला जाणार नाही असे अँकर इमामी यांनी इस्त्रायलला आव्हान दिले आहे. आम्ही आमचे काम सुरू ठेऊ आणि राष्ट्रीय माध्यमे ताकदीने ते प्रसारित करतील असेही त्या म्हणाल्या. (Sahar Imami)

इस्त्रालयाच्या हल्ल्यामुळे निराश व हताश झालेल्या इराणी जनतेवर अँकर सहर यांच्या बोलण्यामुळे एक जोश पहायला मिळाला. इराणसह जगभरातील लो या अँकरच्या धाडसाचे कौतुक करत आहेत. (Sahar Imami)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00